Nashik News | साडेअकरा लाख शिधापत्रिकाधारकांचे ई- केवायसी रखडले

कैलास पवार : रेशन दुकानदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन
Ration news
ई-केवायसी न केल्यास रेशन बंदfile photo
Published on
Updated on

नाशिक : शासनाने रेशनधारकांना ई- केवायसी करणे बंधनकारण केलेले आहे. जिल्ह्यात ७ लाख ९८ हजार ७०३८ लाख ३५ हजार २८८ सदस्यांची ई- केवायसी करण्याचे जिल्हापुरवठा विभागापुढील लक्ष्य होते. त्यानुसार जिल्ह्यातील २६ लाख ८५ हजार २४७ शिधापत्रिकाधारकांची ई- केवायसी प्रक्रिया पुर्ण झाली असून, ११ लाख ५० हजार ४१ शिधापत्रिकाधारकांची ई- केवायसी प्रक्रिया अद्यापही अपूर्ण आहे. ज्या लाभार्थ्यांची ई- केवायसी अपूर्ण आहे, त्यांनी रेशन दुकानदारांकडून पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी केले आहे.

रेशनकार्डधारकांनी ई- केवायसी पूर्ण करण्याबाबत पुरवठा विभागाकडून वारंवार सूचित करण्यात येत आहे. मात्र अनेक रेशन दुकानांमध्ये ई- पॉज मशीन अचानक बंद होत असल्याने ई- केवायसीला अडचण येत आहे. मात्र, या अडचणी दूर करण्यात येणार असून, लाभार्थ्यांनी रेशन दुकानादारांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

अपूर्ण असलेले ई- केवायसी

  • मालेगाव १०२५२८

  • निफाड ११५६९६

  • धाविअ मालेगाव १०२७०१

  • नाशिक ७६४६२

  • बागलाण ८९८७५

  • येवला ५७८११

  • चांदवड ५५१४०

  • धाविअ नाशिक१२५००८

  • नांदगाव ५५२०७

  • पेठ १९५१६

  • इगतपुरी ४७८३२

  • सिन्नर६३००१

  • कळवण ५९१२५

  • देवळा ३१५७२

  • दिंडोरी ७३३३९

  • त्र्यंबकेश्वर३७२१६

  • सुरगाणा ३८०१२

आचारसंहितेने वितरण रखडले

मागील वर्षी आचारसंहिता सुरू झाल्याने मोफत साडी वितरण थांबविण्यात आले होते. त्यामुळे अनेक शिधापत्रिकाधारकांना साडी मिळू शकली नव्हती. त्यामुळे आता प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला साडी मिळावी यासाठी प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे.

तालुकानिहाय अंत्योदय शिधापत्रिकाधारक

  • बागलाण - 13,248,

  • चांदवड - 6,416,

  • देवळा - 5,060,

  • दिंडोरी - 13,127,

  • नाशिक - 10,606,

  • इगतपुरी - 10,738,

  • कळवण - 8,617,

  • मालेगाव - 11,276,

  • नांदगाव - 5,425,

  • मनमाड - 3,323,

  • नाशिक शहर - 8,580,

  • निफाड - 10,786,

  • पेठ - 10,782,

  • सिन्नर - 8,228,

  • सुरगाणा - 15,288,

  • त्र्यंबकेश्वर - 8,818,

  • येवला - 10,009

पुरवठा विभागाकडून तयारी सुरू; 1 लाख 76 हजार साड्यांचे वितरण

नाशिक जिल्ह्यातील 1 लाख 76 हजार 924 अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना लवकरच मोफत साड्यांचे वितरण करण्यात येणार आहे. तशा सूचना राज्य शासनाकडून पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या आहेत. साड्यांच्या वितरणासाठी पुरवठा विभागाकडून तयारी करण्यात येत आहे. साड्यांचे वितरण करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा रेशन दुकानदारांवर सोपविण्यात येणार आहे.

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रत्येक कुटुंबाला एक याप्रमाणे साड्यांचे वितरण शासनाकडून करण्यात येणार आहे. यासंदर्भात नियोजनाच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. सूचनांनुसार लवकरच साडी वितरणाचे नियोजन केले जाणार असून, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मोफत साडी मिळणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या 1 लाख 76 हजार 924 इतकी आहे. यातील प्रत्येक कुटुंबाला एक साडी मोफत देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news