Nashik News | दुर्देवी ! पाण्याच्या साठवणुकीने घेतला चिमुरडीचा जीव

पाण्याच्या डबक्यात पडून चिमुकलीचा मृत्यू
Death by drowning accident
पाण्याच्या डबक्यात चिमुकलीचा मृत्यूpudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : पाणी साचलेल्या डबक्यात पडून दाेन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना उपनगर येथील खर्जुल मळा परिसरात गुरुवारी (दि. २७) घडली. प्रांजल लहू माने (रा. विजयनगर, खर्जुल मळा, जेल राेड) असे तिचे नाव आहे.

पाणी साठवणूक आली अंगलट

खर्जुल मळा भागात माने दाम्पत्य भाडेतत्त्वाने राहात आहे. जुन्या साड्यांच्या बदल्यात स्टील व प्लास्टिकची भांडी देऊन हे कुटुंब उदरनिर्वाह करते. दरम्यान, घरात दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणी कमी पडत असल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी घराजवळ पाणी साठवणूक करण्यासाठी छाेटे डबके तयार केले हाेते. त्यात ते पाणी साठवून वापर करत हाेते.

मुलीच्या शाेधासाठी धावाधाव.. पण

दरम्यान, त्यांची मुलगी प्रांजल ही गुरुवारी (दि.27) दिवसभरात खेळत असताना, अचानक या डबक्यात कलंडली. डबक्यातील पाण्यात चेहरा बुडाल्याने व तिला वेळीच मदत न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. काही वेळाने कुटुंबाने प्रांजलच्या शाेधासाठी धावाधाव केली असता, ती पाण्याच्या डबक्यात आढळून आली. उपनगर पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली असून हवालदार एस. ए. हिवाळे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news