

नाशिक : आदिवासी विकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या भरतीप्रक्रियेदरम्यान पहिल्या टप्प्यात एसईबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्याने ज्या उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या जाहिरातीद्वारे परीक्षा शुल्क भरले होते. त्यांचे शुल्क परत करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार उमेदवारांनी 10 डिसेंबरपर्यंत बँकेची माहिती विहित नमुन्यात भरून देण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्याने पहिली जाहिरात रद्द करून एसईबीसी आरक्षणासह दुसरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी आरक्षण प्रवर्गनिहाय 900 व एक हजार रुपये परीक्षा शुल्क ऑनलाइन स्वरूपात भरले होते. त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार 7 हजार 136 उमेदवारांना परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहे. या उमेदवारांनी बँकेचे नाव, आयएफएससी कोड, पत्ता व केवायसी माहिती अपूर्ण दिल्याने उमेदवारांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात अडचणी येत आहेत. परिणामी 7 हजार 136 उमेदवारांचे अंदाजे 70 लाख रुपये देणे बाकी आहे. आदिवासी विकास विभागामार्फत 19 प्रकारच्या 602 पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात वरिष्ठ लिपिक 187 पदे, माध्यमिक शिक्षण सेवक 14 पदे व प्राथमिक (इंग्रजी माध्यम) 48 पदांचा समावेश आहे.
अपूर्ण माहितीमुळे परीक्षा शुल्क परत करण्यात अडचणी येत आहेत. उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली असून, ज्यांचे नाव यादीत आहे, अशा उमेदवारांनी 10 डिसेंबरपर्यंत बँकेची संपूर्ण माहिती रववलहरीींळ2324 ऽसारळश्र.लेा या मेलवर सादर करावी.
नयना गुंडे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक