Nashik News | माजी मुख्य अग्निशमन दल अधिकारी महाजनांविरोधात अपसंपदेचा गुन्हा

पत्नीच्या नावावरही आढळली बेकायदा संपत्ती
 corruption
माजी मुख्य अग्निशमन दल अधिकारी महाजनांविरोधात अपसंपदेचा गुन्हाfile photo
Published on
Updated on

नाशिक : नाशिक महानगरपालिकेत मुख्य अग्निशमन दल अधिकारी म्हणून कार्यरत असताना अनेक गैरव्यवहार केल्याचे आरोप अनिल महाजन यांच्या विरोधात आहेत. महाजन यांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्यावर नऊ आरोप लावून त्या आरोपांची खातेनिहाय चौकशी सुरु होती. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाजन यांच्या संपत्तीची उघड चौकशी केली. त्यात ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती आढळून आल्याने महाजन यांच्यासह त्यांची पत्नी निशा महाजन यांच्याविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Summary

महाजनांविरोधातील आरोप

  • - अग्निरोधक निधीचा हिशोब लेखा विभागाला सादर न करता त्या निधीतून अग्निप्रतिबंधक व अग्निशमन कार्यासाठी आधुनिक साधनसामग्री खरेदी करताना लेखा विभागाला हिशोब सादर न करणे.

  • - अग्निशमन सेवा शुल्काच्या एक टक्का निधीतून वीस कोटी रुपये जमा झालेले असतानाही सन २०१० ते २०१६ या कालावधीत सुमारे साडे दहा लाख रुपये जमा झाल्याचे दर्शविले.

  • - वरिष्ठांची दिशाभूल करणे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार शहरासाठी अग्निशमन केंद्राची निश्‍चिती करणे व त्या अनुषंगाने फायर हायड्रन्ट, जलस्रोत कार्यान्वित करणे गरजेचे असताना कुठलीही कार्यवाही केली नाही.

  • - धोकादायक इमारतींसाठी अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आल्या कि नाही याचे सर्वेक्षण करणे गरजेचे असताना महाजन यांनी त्यांच्या कार्यकाळात कुठलीच कार्यवाही केली नाही.

  • - अग्निशमन दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची दर सहा महिन्यांनी शारीरीक तपासणी करणे आवश्यक असताना तपासणी न करणे.

  • - विशिष्ट उंचीच्या इमारतींना अग्निरोधक यंत्रणा बसविणे व तपासणी करणे बंधनकारक असताना त्याची वेळोवेळी पाहणी न करता ना हरकत दाखला देणे

अनिल चूडामन महाजन व निशा अनिल महाजन या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांकडे १ कोटी ३१ लाख ४२ हजार ८६९ रुपयांची अपसंपदा आढळून आली आहे. महाजन हे महापालिकेत २२ ऑक्टोबर १९८६ पासून कार्यरत होते. कार्यकाळात त्यांच्यावर अनेक आरोप झाले. त्यात शहरातील २३४ उंच इमारतींना बांधकाम पुर्णत्वाचा दाखला देण्यापुर्वी आवश्यक असलेल्या अग्निशमन यंत्रणेचा ना हरकत दाखला देताना अफरातफर करताना महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणीही महाजन खातेनिहाय चौकशीत दोषी आढळल्याने त्यांचे निवृत्तीवेतन बंद करण्यात आले. माजी मुख्य अग्निशमन दल अधिकारी अनिल महाजन यांचे निवृत्तीवेतन बंद करण्यात आले. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही महाजन यांच्या संपत्तीची उघड चौकशी केली. त्यात ऑक्टोबर १९८६ ते ३१ मे २०१८ दरम्यान, सेवा बजावताना ज्ञात स्त्रोतांपेक्षा महाजन यांनी कायदेशीर उत्पन्नापेक्षा ४२ टक्के अपसंपदा गोळा गेल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले. तसेच अपसंपदा गोळा करण्यासाठी अनिल महाजन यांना पत्नी निशा महाजन यांनी प्रोत्साहन दिल्याचा ठपकाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठेवत त्यांच्याविरोधातही मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news