नाशिक : विजय वड्डेटीवार मुर्दाबाद, हिंदू धर्मगुरूंचा अपमान म्हणजे हिंदू धर्माचा अपमान, वडेट्टीवार माफी मागा अशा घोषणा देत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले.
जगद्गुरू नरेंद्राचार्य यांच्याबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून राज्यभरात काँग्रेस नेते वडेट्टीवारांविरोधात आंदोलन सुरू आहे. याचाच भाग म्हणून महाराजांच्या अनुयायांनी सोमवारी (दि. २४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तत्पूर्वी, अशोकस्तंभापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वडेट्टीवारांची प्रतीकात्मक तिरडी यात्रा काढण्यात आली. जोपर्यंत वडेट्टीवार महाराजांची माफी मागत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अनुयायी मतदानपेटीतून काँग्रेसविरोधात निषेध व्यक्त करतील, अशी भूमिका यावेळी अनुयायांनी मांडली.
आंदोलनात आ. देवयानी फरांदे यांच्यासह नारायण जाधव, प्रवीण ठाकूर, प्रदीप मालानी, उत्तम कोंबडे, नितीन शेळके यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.