

नाशिक : मनीषा खत्री यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी मुंबई येथील महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले आहेत. त्यात डॉ. गुरसळ यांचा समावेश आहे. एनएमआरडीएच्या तत्कालीन आयुक्त मनीषा खत्री यांची २६ डिसेंबर रोजी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरही एनएमआरडीएचा अतिरिक्त कार्यभार खत्री यांच्याकडे होता. आता शासनाने या पदावर डॉ. गुरसळ यांची नियुक्ती केली आहे. ते भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी पालघरचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे.