नाशिक : राज्यात बदलापूर येथे शाळकरी विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शिक्षण विभागाने तत्काळ राज्यातील सर्व शाळांना सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या १४९ शाळांमध्येच सीसीटीव्ही असल्याचे समोर आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील एकूण शाळांमध्ये आवश्यक असलेल्या सीसीटीव्हींचा प्रस्ताव पंधरा दिवसांपुर्वीच जिल्हा नियोजन समितीकडे पाठवला मात्र, अद्याप त्यावर काहीही कार्यवाही झाले नसल्याचे समोर आले आहे.
राज्यभरातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले. जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात यावा. या घटकांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ५ टक्के प्रमाणात राखीव ठेवण्यात आलेल्या निधीतून कॅमेरे बसविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
बागलाण : २९४ (२,०६३)
चांदवड : १७५ (१,०६५)
देवळा : ११५ (७५०)
दिंडोरी : १८५ (१,४४७)
इगतपुरी : २२० (१,४०६)
कळवण : १९९(५९७)
मालेगाव ३२७७ (१,७८१)
नांदगाव : २०२ (१,१०१)
नाशिक : ८८ (१,०२५)
निफाड : १९० (१,५२३)
पेठ : १८८ (९९२)
सिन्नर : १९४ (१,३१२)
सुरगाणा : ३१२ (१,५०८)
त्र्यंबकेश्वर : २४४ (१,२९०)
येवला : २२५ (६७५)
जिल्हा परिषदेने तालुकास्तरावरून सीसीटीव्ही बाबत अहवाल मागवला होता. यामध्ये एकूण ३ हजार २५७ पैकी १४९ शाळांना ४५१ सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे समोर आले. उर्वरित ३ हजार १०८ शाळांमध्ये १८ हजार ५३५ कॅमेरे बसविण्याबाबतचा प्रस्ताव, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकारी यांना ३० ऑगस्टला सादर करण्यात आला आहे.