सिडको (नाशिक)
सिडको : इगतपुरी येथे प्रशांत खरात यांच्या नेतृत्वाखाली दाखल झालेला ट्रॅक कॉम्पोनंट्स कंपनीच्या कामगारांचा चड्डी मोर्चा.Pudhari News Network

Nashik Chaddi Morcha: नाशिकहून मुंबईत मंत्रालयाच्या दिशेने निघाला ‘चड्डी मोर्चा’, काय आहेत प्रमुख मागण्या?

Nashik Latest News: नाशिक : ‘चड्डी मोर्चा’ कसाऱ्यात दाखल; अन्याय धोरणांविरोधात ट्रॅक कॉम्पोनंट्स कामगारांचा एल्गार,
Published on

सिडको (नाशिक) : औद्योगिक वसाहतीमधील ट्रॅक कॉम्पोनंट्स या कंपनीकडून स्थानिक कामगारांवर होत असलेल्या अन्यायकारक व मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणीत मार्शल संघटित-असंघटित कामगार युनियनने ‘चड्डी मोर्चा’ काढला आहे. सोमवारी कामगार उपायुक्त कार्यालय येथून थेट मंत्रालय गाठण्यासाठी मोर्चा मुंबईकडे कूच झाला. दोन दिवसांत कामगारांनी ६४ किलोमीटर अंतर पार करत ते कसाऱ्यात दाखल झाले.

आंदोलनाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात करत आहेत. स्थानिक कामगारांची अवहेलना करून बाहेरून मजूर मागवणे, कामगारांवर मानसिक दबाव आणणे, कंत्राटी कामगारांना विनासूचना कमी करणे तसेच युनियनशी संबंधित कामगारांवर वैयक्तिक कारवाई होणे अशा समस्या वाढल्याने आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Nashik Latest News

या आंदोलनात शहरातील विविध कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. मंगळवारी रात्री मोर्चा कसाऱ्यापर्यंत पोहोचला असून, बुधवारी (दि.4) शहापूरकडे ते कूच करणार आहेत. या आंदोलनाची कंपनी प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मोर्चा गुरुवार (दि.5 जून) मंत्रालय येथे पोहोचणार असून, मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार असल्याची माहिती खरात यांनी दिली.

कामगारांच्या प्रमुख मागण्या

  • कंत्राटी कामगारांना कायदेशीर सुरक्षा मिळावी.

  • स्थानिक कामगारांविरोधातील बेकायदेशीर कंत्राट रद्द करावे.

  • कंपनीवर अतिक्रमणाबद्दल तत्काळ कारवाई करावी.

  • अनधिकृत पार्किंग, वृक्षतोडीविरुद्ध कारवाई करावी.

  • युनियन सदस्यांचे निलंबन थांबवावे.

  • सर्व कामगारांना कायम करावे.

  • अपघातांबद्दल दोषींवर कारवाई करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news