

येवला (नाशिक) : येवला बस डेपोला येथून दहा पासून मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच बस आपल्याला प्राप्त झाले आहे. या बसेसचा विद्यार्थ्यांच्या मार्गावर प्राधान्याने उपयोग करून शालेय विद्यार्थ्यांना बसेसच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे प्रतिपादन राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शुक्रवार (दि.23) रोजी आज येवला बस आगारातील नवीन पाच बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, मकरंद सोनवणे, भाऊसाहेब धनवटे, अविनाश कुक्कर, सुमित थोरात, गोटू मांजरे, विशाल परदेशी, दीपक पवार, आगार व्यवस्थापक प्रवीण हिरे यांच्यासह अधिकारी, पदाधिकार व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राज्यातील गोरगरीब जनतेला प्रवासासाठी बस ही अतिशय महत्त्वाची यंत्रणा आहे. गोरगरीब जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. बस डेपोला प्राप्त झालेल्या पाच बसेस शालेय विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्राधान्याने वापराव्या. पुढील महिन्यात अजून पाच बस डेपोला उपलब्ध होतील. या सर्व बसेसचे योग्य नियोजन करून प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशा सूचना यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी केले.