Nashik News : बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे आज लोकार्पण

बहुआयामी व्यक्तिमत्वातील विविध पैलूंचा होणार उलगडा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गंगापूर रोडवरील पंपिंग स्टेशन येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वातील विविध पैलू उलगडणारे स्मृती उद्यान उभारण्यात आले असून, या निमित्ताने नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या उद्यानाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि.२८) दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे, अशी माहिती शिवसेना उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.

Summary

स्मृती उद्यानातील ठळक बाबी अशा...

  • चित्रकार, व्यंगचित्रकार, शिल्पकारांसाठी कलादालन

  • बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाच्या ध्वनिफिती, चित्रफितींचे ईव्ही रूम. ई. वाचनालय

  • ५०० आसनी खुले नाट्यगृह * उद्योग-व्यवसाय प्रशिक्षण केंद्र

  • ॲडव्हेंचर पार्क

  • ३०० आसनी बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह

नाशिक महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे शस्त्रसंग्रहालयाची उभारणी करण्यात आली होती. सदरचा संपूर्ण ७.५० एकर असलेल्या परिसरचा सदुपयोग करून या ठिकाणी बाळासाहेबांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वातील विविध पैलूंना अनुसरून एक सर्वसमावेशक स्मृतीकेंद्र उभारण्याची अजय बोरस्ते यांची संकल्पना होती. महापालिका आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करून ती प्रत्यक्षात उतरविण्यात आली आहे. नाशिकच्या कलावंतांसाठी अद्यावत कलादालन या स्मृतीकेंद्राचे एक प्रमुख आकर्षण आहे. या माध्यमातून स्थानिक युवा चित्रकार, व्यंगचित्रकार, शिल्पकार यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. बाळासाहेबांना अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभली होती. त्यांच्या कौशल्यांचा परिचय करुन देणाऱ्या काही ध्वनीफिती, चित्रफिती, मुलाखती यांचा ठेवा असणारे तसेच बाळासाहेबांची रोखठोक पत्रकारिता, दांडगे वाचन, आणि टोकदार लिखाण यांची प्रचिती देणारे जगातील सुप्रसिध्द लेखकांची सुप्रसिध्द पुस्तकांचा ठेवा असणारे ईव्ही रूम व वाचनालयाच्या धाटणीवर तसेच सध्याच्या काळाला अनुसरुन ई-वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वातील विविध पैलू उलगडणारे हे स्मृती उद्यान आहे. बाळासाहेबांचे धगधगते विचार कायम जिवंत राहावे, त्यांच्या विचारांची पिढी निर्माण व्हावी यासाठी हे स्मृती स्मारक उभारण्यात आले आहे.

अजय बोरस्ते, उपनेते, शिवसेना, शिंदे गट, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news