Nashik News | शहर पोलिस आयुक्तालयात तीन महिला सहायक पोलिस आयुक्तांची नियुक्ती

राज्यातील सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या
Nashik News
राज्यातील सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्याFile Photo

नाशिक : राज्य पोलिस सेवेतील सहायक पोलिस आयुक्त व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने काढले आहेत. त्यानुसार नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात तीन महिला सहायक पोलिस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर दोघांची परजिल्ह्यात बदली झाली आहे.

राज्यातील ६८ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि.३) काढले. त्यानुसार मिरा-भायंदर-वसई-विरारच्या सहायक आयुक्त पद्मजा बढे-चव्हाण, सोलापूर प्रशिक्षण केंद्रातील उपअधीक्षक अनुराधा उदमले, महाराष्ट्र पोलिस अकादमीतील संगिता राजेंद्र निकम यांची नाशिक शहरात सहायक पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर नाशिकचे सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांची अमरावतीतील अंजनगाव येथे उपविभागीय पोलिस अधिकारी, तर नाशिक शहर आस्थापनाचे अंबादास भुसारे यांची हिंगोली उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे नाशिक ग्रामीणच्या पेठ उपविभागीय अधिकारी कविता फडतरे, मुंबई नागरी हक्क संरक्षणचे सुनिल घुगे व अमरावती दर्यापूरचे गुरुनाथ नायडू यांची महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे बदली झाली आहे. तर महाराष्ट्र पोलिस अकादमीतील संजय बांबळे यांची धुळे येथील साक्रीत बदली केली आहे. तसेच लातूर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल गोसावी यांची नाशिक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीत नियुक्ती केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news