कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी (दि.28) दुपारी एक वाजता तालुक्यातील सोमठाणे येथे तातडीची बैठक बोलावली आहे. file
सिन्नर : बेमोसमी पावसामुळे जिल्ह्यासह राज्यात होणाऱ्या संभाव्य नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी (दि.28) दुपारी एक वाजता तालुक्यातील सोमठाणे येथे तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला नाशिक जिल्ह्यातील कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाने शासकीय हमीभावाने खरेदी केलेल्या सोयाबीनला ग्रेडरकडून रिजेक्ट करण्यात आल्याने तो विषयदेखील बैठकीत चर्चेला घेतला जाणार आहे. पीकविमा, रासायनिक खतांचे लिंकिंग या विषयाचाही कृषिमंत्री कोकाटे यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे.

