Nashik News | महिलांविरोधात खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे आदेश

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खोटा गुन्हा
Action orders against police for filing false cases against women
महिलांविरोधात खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे आदेशFile Photo
Published on
Updated on

नाशिक : कौटुंबिक वादाची तक्रार देणाऱ्या विवाहितेसह तिच्या आईस मारहाण करीत दोघींविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खोटा गुन्हा दाखल करून अटक केल्याप्रकरणी महिला पोलिस निरीक्षकासह इतर सात महिला अंमलदारांना पोलिस तक्रार प्राधिकरणने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी पोलिस प्रशासनाने संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, असे आदेश पोलिस तक्रार प्राधिकरणने दिले आहेत, अशी माहिती अॅड. उमेश वालझाडे यांनी दिली.

अॅड. वालझाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्राजक्ता योगेश नागरगोजे यांनी महिला सुरक्षा समितीकडे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती. ३० मार्च २०२२ रोजी समुपदेशन करताना समितीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी नांदण्यास सासरी जावे यासाठी डाॅ. प्राजक्ता यांच्यावर दबाव टाकला. त्यामुळे त्यांनी नकार दिल्याने समितीच्या तत्कालीन पोलिस निरीक्षक ज्योती आमने यांनी प्राजक्ता यांना मारहाण केली. तसेत इतर आठ महिला कर्मचाऱ्यांनी प्राजक्ता यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचा आरोप डॉ. प्राजक्ता यांनी केली. त्यानंतर आईसह सरकारवाडा पोलिस ठाण्यात बसवून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात दोघा मायलेकींना अटक करून सहा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवले. जामीन मिळाल्यानंतर डॉ. प्राजक्ता यांनी पोलिस तक्रार प्राधिकरणाकडे आमने यांच्यासह इतर आठ कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दिली.

त्याअनुषंगाने विभागाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. रुपाली लाटे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात डॉ. प्राजक्ता यांच्या वतीने अॅड. उमेश वालझाडे, अॅड. प्रशांत देवरे, अॅड. राज सिंग यांनी युक्तीवाद केला. त्यात आठही महिला पोलिसांनी पदाचा गैरवापर करीत गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच संबंधित आठही पोलिसांवर महाराष्ट्र विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण प्रशासकीय व कार्यपद्धती विनीयम २०१८ व नियमांनुसार दाेषी धरून त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणचे सदस्य अमित डमाळे व शामराव दिघावकर यांनी दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news