Nashik News | शेंगदाणे, फुटाणे विक्री करणाऱ्या महिलेस मारहाण करणारा म्होरक्या गजाआड

महिलेला मारहाण, दहशत पसरवुन लूटमार करणारा म्होरक्या गजाआड
Nashik City Anti-Gunda Squad.
नाशिक : तोडफोड व लूटमार करणाऱ्या टोळीतील पकडलेला संशयित. समवेत नाशिक शहर गुंडा विरोधी पथक.pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : नाशिक-पुणे रोडवरील मद्यविक्री दुकानाबाहेरील शेंगदाणे, फुटाणे विक्री करणाऱ्या महिलेस मारहाण करून गल्ल्यातील ७०० रुपये बळजबरीने घेणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास गुंडाविरोधी पथकाने पकडले आहे. या टोळीतील दोघांना याआधी अटक झाली असून, म्होरक्यास पाठलाग करीत पथकाने पकडले.

Summary

नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने किरण रतन पाटील उर्फ गुजर (३५, रा. पंचशिलनगर, उपनगर) संशयिताला १० जुलै रोजी त्याच्यासह चौघांविरुद्ध दाखल झालेल्या दरोड्याप्रकरणी अटक केली. गुजर व अन्य चार जणांनी एका महिलेला मारहाण केली होती. (३९) आणि तिने रस्त्याच्या कडेला एका दारूच्या दुकानासमोर लावलेली फुटाणे आणि शेंगदाण्याची गाडीची तोडफोड केली. उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टोळक्याने २७ जून रोजी रावल वाइन्ससमोरील हातगाडीचालक अलका साटोटे यांची हातगाडी उलटवून टाकत गल्ल्यातील रोकड पळविण्यात आली होती. तसेच अलका व त्यांच्या मुलांना धमकावत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला होता. संशयित सागर सदावर्ते, किरण पाटील, रोहित जाधवसह इतर दोन संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून ही तोडफोड, लूटमार केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी गुरुवारी (दि. ११) उपनगर पोलिस ठाण्यात टोळक्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अधिक तपास करीत संशयित सागर सदावर्ते व रोहित जाधव यांना अटक केली होती, तर किरण पाटील व त्याचे साथीदार पसार झाले होते. तपासादरम्यान, मुख्य संशयित किरण पाटील हा उपनगरच्या पंचशिलनगर येथे असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला होता. पोलिसांची चाहूल लागताच किरणने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेत पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

संशयितांकडून दहशत

पाचही संशयित हातात दांडके घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. साटोटे यांना धमकावत हातगाडीवरील मालाचे नुकसान करुन ती उलथवून टाकली. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धमकावले. यामुळे परिसरात दहशत निर्माण होऊन स्थानिकांनी व्यवहार बंद केले. यानंतर पाच जणांनी तोडफोड, दहशत सुरुच ठेवली. काही वेळाने संशयित पसार झाले. या संशयितांविरोधात याआधीही तक्रारी असल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news