

नांदगाव (नाशिक) : नांदगाव आगाराने गत आर्थिक वर्षात उल्लेखनीय यश संपादन करत ३५ कोटी १३ लाख रुपयांचा महसूल जमा केला असून, ६५ लाख ६२ हजार रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
जिल्ह्यातील एकूण १३ आगारांपैकी निव्वळ उत्पन्नाच्या गटात नांदगाव आगाराने पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या स्थानी लासलगाव तर, तृतीयस्थानी इगतपुरी आगार आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४च्या तुलनेत उत्पन्नवाढीचा आलेख अधिक उंचावल्याचे चित्र दिसून येत आहे.
एकूण बस गाड्या : 52
एकूण प्रवासी संख्या : 76 लाख 95 हजार
वर्षभरात झालेला फेरा किमी : 59 लाख 46 हजार
एकूण मिळालेलं वार्षिक उत्पन्न : 35 कोटी 13 लाख
निव्वळ नफा : 65 लाख 65 हजार
अहिल्याबाई होळकर लाभार्थी प्रवासी : 3112
एकूण पासधारक विद्यार्थी : 1412
वर्षभरात आगारातील ५२ बसेस प्रतिदिन 16 हजार 300 याप्रमाणे वर्षभरात 59 लाख 46 हजार किलोमीटर धावल्यात. त्यातून 76 लाख 95 हजार प्रवाशांनी प्रवास केला. 20 लाख 48 हजार 728 महिला, दोन लाख 15 हजार 45 ज्येष्ठ नागरिक, तर ७५ वर्षांवरील १० लाख 48 हजार 63८ प्रवाशांनी प्रवासी सेवेचा लाभ घेतला.
नांदगाव आगाराच्या माध्यमातून, मालेगाव, सप्तशृंग गड, येवला, शिर्डी, मनमाड, चाळीसगाव, कन्नड, पाचोरा, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, माहूर गड, जळगाव यांच्यासह ग्रामीण भागामध्ये बससेवा दिली जाते. त्यासाठी चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी असे एकूण 250 कर्मचारी मेहनत घेतात.
दोन वर्षांपासून नांदगाव आगार नफ्यात आहे. विशेष म्हणजे जुन्या व कमी बस असतानादेखील नफा कमविला आहे. आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून पाच नवीन बस मिळाल्या असून, त्याद्वारे दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न राहील. जुन्या बसमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत दिलगिरी आहे.
हेमंत पगार, आगार व्यवस्थापक, नांदगाव, नाशिक.