Nana Mahale
नाना महालेfile photo

नाशिक : नाना महाले यांचा आज शरद पवार गटात प्रवेश

ब्रेकींग! नाना महाले यांचा आज शरद पवार गटात प्रवेश

सिडको : लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक नाना महालेंसह शेकडो कार्यकर्ते रविवारी दुपारी १२ वाजता पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे गोविंदबाग येथे स्व:गृही परतणार आहे. महाले यांच्या प्रवेशामुळे सिडको भागात अजित पवार गटाला खिंडार पडणार असून, पवार यांच्याशी पूर्वीपासून नाळ जोडलेली असल्याने पुन्हा स्व:गृती परतत असल्याचे महाले यांनी सांगितले.

Summary

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने अनेक पदाधिकारी आता परतण्याच्या मनस्थितीत दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक नाना महालेंसह शेकडो कार्यकर्ते रविवारी दुपारी १२ वाजता पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे गोविंदबाग येथे स्व:गृही परत येत आहेत.

नाना महाले यांच्यासमवेत माजी नगरसेवक दत्ता पाटील, विभाग अध्यक्ष मकरंद सोमवंशी समवेत शेकडो कार्यकर्ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरात नाशिकमधील आमदार, पदाधिकाऱ्यांनी पवारांची साथ सोडून अजित पवारांना साथ दिली. परंतु, लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने अनेक पदाधिकारी आता परतण्याच्या मनस्थितीत दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक नेते नाराज असल्याचीही चर्चा आहे. महालेंसह समर्थक शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याने अजित पवार गटाला खिंडार पडणार आहेत. तर शरद पवार यांच्याशी पूर्वीपासून नाळ जोडलेली असल्याने आम्ही पुन्हा स्व:गृती परतत असल्याचे महाले यांनी सांगितले.

logo
Pudhari News
pudhari.news