

नाशिक : मविप्रच्या कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाच्या हिंदी विभागप्रमुख डॉ. दीपा कुचेकर यांना मध्य प्रदेश शासनातर्फे सन्मानित करण्यात आले. (Dr. Deepa Kuchekar Assistant Professor at MVP's Acs college)
भाषा संरक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत त्यांना मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी गौरविण्यात आले. भोपाळ येथील रवींद्र भवनमध्ये पार पडलेल्या या समारंभप्रसंगी मध्य प्रदेश शासन सांस्कृतिक विभाग मुख्य सचिव शिवशेखर शुक्ला, जनजातीय लोककला एवं बोली विकास अकादमीचे निर्देशक डॉ. धर्मेंद्र पारे, भाषा वैज्ञानिक डॉ. कविता रस्तोगी आदी मान्यवर उपस्थित होते.
मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, बाळासाहेब क्षीरसागर, विश्वास मोरे आदींसह संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन केले.