नाशिक : मविप्र सुरू करणार हेल्थ केअर अकॅडमी

मविप्र सुरू करणार हेल्थ केअर अकॅडमी; टेक महिंद्रा फाउंडेशनसोबत करार
मविप्र-'स्किल्स फॉर मार्केट ट्रेनिंग इन हेल्थ केअर'
नाशिक : सामंजस्य कारारप्रसंगी ॲड. नितीन ठाकरे, जया लुहाना, डॉ. एस.एस. काळे आदी.pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : टेक महिंद्रा फाउंडेशन व मविप्र संस्था यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार झाला असून, या माध्यमातून लवकरच नाशिकमध्ये हेल्थ केअर अकॅडमी सुरू करण्यात येणार आहे.

वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन टेक महिंद्रा फाउंडेशन आणि मविप्र यांच्यात पुणे येथे सामंजस्य करार झाला. या अनुषंगाने दोन्ही संस्थांच्या वतीने पुढील ३ वर्षांसाठी नाशिक येथे 'स्किल्स फॉर मार्केट ट्रेनिंग इन हेल्थ केअर' ही अकॅडमी सुरू करण्यात येणार आहे. या करारावर स्वाक्षरी करताना टेक महिंद्रा फाउंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापक जया लुहाना व मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, केटीएचएमचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे उपस्थित होते.

नाशिकमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ मिळण्यास या कराराचा फायदा होणार आहे. या अकॅडमी अंतर्गत हेल्थकेअर या सेक्टरमधील जॉब रेडी कोर्सेसचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यातून युवक-युवतींना रोजगार तर मिळणार आहेच, शिवाय वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळण्यास मदत होणार आहे.

ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र, नाशिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news