Nashik Crime News | सराईत गुन्हेगाराच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

नाशिक: घरात घुसून सराईत गुन्हेगाराची हत्या, दोघांना अटक
Murder
नाशिक हादरलं ! घरात शिरून हद्दपार गुन्हेगाराची हत्याpudhari photo

नाशिक : गाढ झोपेत असलेल्या सराईत गुन्हेगाराची घरात घुसून हत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.५) मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आला होता. गंजमाळ येथील पंचशीलनगरात पांडुरंग ऊर्फ पांड्या हनुमंत शिंगाडे (१९) याची त्याच्याच तिघा मित्रांनी पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने हत्या केली होती. हत्येनंतर तिघेही संशयित आरोपी फरार झाले होते.

संशयित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी तत्काळ पथके शहर व परिसरात पाठविली असता, शनिवारी (दि.६) संशयित कैलास गायकवाड आणि एका अल्पवयीनास ताब्यात घेतले आहे. तर तिसरा संशयित आरोपी अद्यापही फरार आहे. दरम्यान, मृत पांडुरंगवर भावादेखत सपासप वार होत असताना त्याची भाची माधुरी शिवरे ही घरात आली असता, कैलास गायकवाड याने तिला धक्का देत मुख्य दरवाजातून पळ काढला. तर अन्य दोघांनी घराच्या पाठीमागे असलेल्या खिडकीतून उडी मारून पळ काढल्याचे तिने तिने पोलिसांना सांगितले होते. माधुरीने खिडकीतून पळून जाणाऱ्या दोघांपैकी ज्याच्या हातात चॉपर होता, त्याचे नाव निखिल सच्चे असल्याची पोलिसांना ओळख दिली होती. निखिल हा पांडुरंगचा मित्र असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. दरम्यान, एक संशयित आरोपी अद्यापही फरार असून, पोलिस त्याचा कसुन शोध घेत आहेत.

Murder
Murder | नाशिक हादरलं ! घरात शिरून सराईत गुन्हेगाराची हत्या

अल्पवयीनकडून चॉपरने वॉर

मृत पांडुरंगचा भाऊ विकासने देखील मारेकऱ्यांमधील एकाची पोलिसांना ओळख दिली होती. त्याचे नाव कैलास गायकवाड असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. इतर दोनजण अनोळखी होते. कैलासने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने पांडुरंगच्या डोक्यात व छातीवर वार केला. तर त्याच्यासोबत असलेल्या एका सडपातळ बांध्याच्या अल्पवयीनाने चॉपरने पांडुरंगच्या बरगडीजवळ मारले, तर एकाने पांडुरंंगला पकडून ठेवले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news