Nashik Murder Case | शिर उडविणाऱ्याला ६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

फरार बापाला अटक
Nashik Murder Case |
न्यायालयFile Photo
Published on
Updated on

नाशिक : मुलगी बेपत्ता होण्यामागे फूस असल्याच्या कारणावरून शेजाऱ्याचे शिर धडावेगळे केल्याची घटना ननाशी (ता. दिंडोरी) गावात बुधवारी (दि. १) घडली होती. याप्रकरणी संशयित सुरेश रामदास बोके याला गुरुवारी (दि. २) न्यायालयात हजर केले असता, येत्या ६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याच प्रकरणातील फरार संशयित रामदास उर्फ रामड्या सुरेश बोके याला अटक करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बुधवारी सकाळी 10.30 च्या सुमारास ननाशी - पेठ रस्त्यावरील सरकारी दवाखान्यासमोर ही घटना घडली होती. मीनाबाई गुलाब वाघमारे (३४) यांनी पेठ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित सुरेश बोके यांची मुलगी पळून गेली असून, तिला गुलाब वाघमारे यांनी मदत केल्याचा संशय संबंधितांना संशय होता. यातून सुरेश आणि त्याचे वडील रामदास यांनी कोयता आणि कुऱ्हाडीने वार करत गुलाब यांचे शिर धडावेगळे करत खून केला. संशयित सुरेश हा हत्यार आणि शिर घेऊन पोलिस चौकीत दाखल झाला होता. बाप-बेट्यावर गुन्हा दाखल झाला असून, सुरेशला न्यायालयाने ६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फरार रामदासच्या मुसक्या गुरुवारी आवळण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news