Kumbh Mela 2027 Nashik | "नाशिक महापालिकेचा मोठा निर्णय! कचऱ्यापासून बनणार सीएनजी, 'वेस्ट-टू-सीएनजी' प्रकल्प उभारणार"

Kumbh Mela 2027 Nashik | कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कचरा व्यवस्थापनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
Nashik Kumbh Mela 2027
Nashik Kumbh Mela 2027 Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तसेच परिसरातील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका अत्याधुनिक 'वेस्ट-टू-सीएनजी' प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. खत प्रकल्पासाठी आरक्षित जागेजवळ पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Nashik Kumbh Mela 2027
Goa AI Traffic Camera | एआय कॅमेऱ्यावरून दंडास तूर्तातूर्ती 'ब्रेक'

महापौरांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हास्तरावरून आसपासच्या सोळा गावांतील कचरा व्यवस्थापनासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाला आहे.

या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी 'वेस्ट-टू-सीएनजी' प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. 'वेस्ट-टू-सीएनजी' प्रकल्पाची कार्यपद्धती, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या समवेत महापालिका अधिकाऱ्यांनी पुणे येथील प्रकल्पाला भेट दिली.

या अभ्यासाच्या आधारे पुढील महासभेत प्रकल्पासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. यावेळी उपमहापौर विलास शिंदे व स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप उपस्थित होते.

रस्तेकामांच्या गुणवत्तेसाठी 'थर्ड पार्टी ऑडिट'

शहरातील रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत महापौरांनी सांगितले की, रस्ते कामांची तपासणी करण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. क्वालिटी कंट्रोल अधिकारी प्रत्यक्ष स्थळांवर जाऊन कामांची पाहणी करत आहेत. निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबंधित ठेकेदारांकडून ते काम पुन्हा करून घेण्याचे आदेश देण्यात येत आहेत.

Nashik Kumbh Mela 2027
SIR Campaign Election | 'एसआयआर सुरू आहे... 1 ऑगस्टनंतर या' सातपूर विभागीय कार्यालयात नागरिकांना हेलपाटे

186 मराठी शाळांना करसवलत

महासभेत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना महापौरांनी खासगी अनुदानित व विनाअनुदानित मराठी शाळांना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये करसवलत देण्याच्या निर्णयाचा उल्लेख केला.

या निर्णयाचा १८६ पेक्षा अधिक शाळांना लाभ मिळणार असून, शाळांच्या खर्चात बचत होऊन शैक्षणिक सुविधा वाढविण्यास मदत होणार आहे. तसेच अंगणवाडीसेविका, मुख्यसेविका व मदतनवीस यांच्या मानधनवाढीचा अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news