Nashik Municipal Corporation | पाणी आरक्षणाचा सुधारित प्रस्ताव सादर

Nashik Municipal Corporation | जिल्ह्याधिकाऱ्यांकडे नाशिक मनपाची ८, २८० दलघफू आरक्षणाची मागणी
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळा, शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने पाणी आरक्ष üçün कमर कसली आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन, पाटबंधारे विभागाच्या धरणांमधून ८ हजार २८० दशलक्ष घनफूट (दलघफू) पाणी आरक्षित करण्याची मागणी महापालिकेने केली आहे.

Nashik Municipal Corporation
Traffic Diversion | दिवाळी खरेदीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विशेष वाहतूक बदल; सात प्रमुख मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी

यासंदर्भातील सुधारित प्रस्ताव महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. महापालिकेने दि. १५ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२७ या कालावधीसाठी शहराच्या नियमित पाणीपुरवठ्याकरिता ७ हजार ६४५ दलघफू पाण्याची मागणी केली आहे.

याशिवाय जुलै - ऑगस्ट २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम आणि देशभार येणाऱ्या लाखो भाविकांच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी ६३५ दलघफू अतिरिक्त पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण पाणी आरक्षणाचा प्रस्ताव ८ हजार २८० दलघफूवर पोहोचला आहे.

पाणीकपातीतून नाशिकला वगळण्याची मागणी

अल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे राज्यातील ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास, नाशिक शहराकडे स्थलांतर वाढण्याची शक्यता महापालिकेने प्रस्तावात व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातून सुमारे १० टक्के लोकसंख्या शहरात स्थलांतरित होण्याचा अंदाज गृहीत धरून त्यासाठी २७५ दलघफू अतिरिक्त पाण्याची तरतूद मागण्यात आली आहे.

दुसरीकडे, राज्य शासनाने पाणी आरक्षणात १० टक्के कपातीचे निर्देश दिले असले, तरी सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्व लक्षात घेता, नाशिकला या कपातीतून वगळण्यात यावे, अशी मागणी महापालिकेने केली आहे.

Nashik Municipal Corporation
Simhastha Kumbh Mela | नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आखाड्यांच्या निधीत घसघशीत वाढ; प्रत्येकी 7 कोटी मिळणार

नव्या जलवाहिनीमुळे पाणीपुरवठा सुधारणार

शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान १ हजार ८०० मिमी व्यासाची नवीन गुरुत्ववाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबरअखेर या जलवाहिनीची चाचणी घेऊन ती कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. तसेच बारा बंगला आणि पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमतावाढ पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे. या कामांमुळे आगामी काळात शहराला वाढीव पाणीपुरवठा करणे अधिक सुलभ होणार असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे.

प्रस्तावानुसार गंगापूर धरण समूहून शहरासाठी ५ हजार ७१५ आणि सिंहस्थासाठी ६५, असे एकूण ५ हजार ७८० दलघफू पाणी अपेक्षित आहे. मुकणे धरणातून शहरासाठी १ हजार ७००, तर सिंहस्थासाठी ५७० दलघफू पाण्याची मागणी करण्यात आली आहे. या धरणातून एकूण २ हजार २७० दलघफू पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे. दारणा धरणातील छेहेडी बंधाऱ्यातून शहरासाठी २३० दलघफू पाणी मागण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.