Nashik Municipal Corporation news | सैंदाणे, खोडे, बनकर स्वीकृत नगरसेवक

जप शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांनी बिनविरोध निवड होताच गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला
Nashik Municipal Corporation Election / नाशिक महानगरपालिका निवडणूक
Nashik Municipal Corporation Election / नाशिक महानगरपालिका निवडणूकPudhari News Network
Published on
Updated on

पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेच्या तीन स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी गुरुवारी (दि. २२) नगराध्यक्ष मनोज बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत भाजप गटनेते व उपनगराध्यक्ष सतीश मोरे यांच्या शिफारस पत्रानुसार नरेंद्र सैंदाणे, शिवसेना गटनेते नगरसेवक नीलेश पाटील यांच्या शिफारस पत्रानुसार रामकृष्ण खोडे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गटनेते नगरसेवक गणेश बनकर यांच्या शिफारस पत्रानुसार भास्कर बनकर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड केली.

यावेळी भाजप शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांनी बिनविरोध निवड होताच गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नगराध्यक्ष मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, नगरसेवक नीलेश पाटील, रेखा लभडे, सुजित मोरे, ज्ञानेश्वर जोगारे, कल्पना विधाते, श्वेता मोरे, माणिक वाघ, सोनाली विधाते, इम्रान कोतवाल, अनिता गांगुर्डे, छाया पाटील आदींसह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप तसेच शिवसेनेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख् संख्या मोठी होती. मात्र, पक्षाला प्रत्येकी एकच नगरसेवक देण्याची तरतूद असल्याने सर्वांना एकाच वेळी संधी देता आली नसली तरी स्वीकृत नगरसेवक पद एक वर्षासाठी असेल. त्यामुळे पाच वर्षात भाजपचे पाच व शिवसेनेचे पाच असे दहा कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाईल.

- सतीश मोरे, उपनगराध्यक्ष, पिंपळगाव बसवंत

रामकृष्ण खोडे यांनी शिवसेना उमेदवारांच्या विजयासाठी प्रत्येक प्रभागात बहुमोल योगदान दिले. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांना प्रथम संधी दिली. पाच वर्षांत पाच कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाईल.

- राजेश पाटील, शिवसेना नेते, पिंपळगाव बसवंत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news