Nashik Road Condition | खड्डे, पाणीप्रश्नावरुन महासभेत आक्रोश

Nashik Road Condition | नगरसेवकांमध्ये प्रांतवाद; रस्ते दुरुस्तीसाठी ९० कोटींच्या निविदा, तर पाणीप्रश्नावर टँकरचा उतारा
Nashik Road Condition | खड्डे, पाणीप्रश्नावरुन महासभेत आक्रोश
Published on
Updated on

पुढारी वृत्तसेवा

रस्त्यांवरील खड्डे आणि धरणांत मुबलक साठा असूनही नाशिक शहराला गेल्या काही महिन्यांपासून भेडसावणाऱ्या कृत्रिम पाणीटंचाई महापालिकेच्या यावरून शुक्रवारी (दि.६) झालेल्या विशेष महासभेत नगरसेवकांनी आक्रोश करत प्रशासनाला धारेवर धरले. पाणीप्रश्नावरून तर थेट पंचवटी, मध्य नाशिक, सिडको, नाशिकरोड, सातपूर असा प्रांतवादाचा संघर्ष पेटल्याचे चित्र महासभेत दिसले.

Nashik Road Condition | खड्डे, पाणीप्रश्नावरुन महासभेत आक्रोश
गुणरत्न सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणावर एसटी संघटना भडकल्या ! चूल बंद होत असल्याचा केला आरोप

तब्बल साडेआठ तास चाललेल्या चर्चेअंती खड्डेमुक्तीसाठी मार्चअखेरपूर्वी ९० कोटींच्या रस्ते दुरुस्तीच्या निविदा काढण्याचे आदेश देताना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्ते घडल्यास ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिले.

अपघात जाहीर निषेध नाशिक : महासभेत पाणीप्रश्नावरून हंडा घेऊन आंदोलन करताना पंचवटीतील नगरसेविका प्रियंका माने. दुसऱ्या छायचित्रात खड्डे व पाणीप्रश्नावरून आक्रमक झालेले नगरसेवक. तिसऱ्या छायाचित्रात निर्णय देताना महापौर हिमगौरी आहेर-आडके. (छायाचित्रे : हेमंत घोरपडे) महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष महासभेत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

गुरुवारी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका प्रियंका माने यांनी आंदोलन करत द्वारका परिसराचे पाणी रोखल्याचे पडसाद महासभेत उमटले. माने यांनी महासभेतही निषेधाचा फलक आणि हंडा घेऊन प्रवेश करत प्रभागातील पाणीप्रश्न मांडला. द्वारका भागात दोनदा दिले जाणारे पाणी कमी करून पंचवटीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली. त्यास सचिन मराठे, सीमा पवार यांनी जोरदार विरोध करताना द्वारका परिसराचे पाणी बंद करून नागरिकांना वेठीस धरणे गैर असल्याची नाराजी व्यक्त केली.

द्वारका परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्यास सभागृहात आंदोलन करण्याचा इशारा सीमा पवार यांनी दिला. मुकणे धरण पाणीपुरवठा योजना सिडकोसाठी राबविण्यात आली असताना सिडकोचे पाणी अन्य विभागात पळविण्याचे कारण काय, असा सवाल करत मुकेश शहाणे, प्रवीण तिदमे, प्रतिभा पवार यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांना जाब विचारला.

कालिका पंप बंद का केला? असा थेट सवाल केल्यानंतर वातावरण तापले. मुकणेचे पाणी अन्यत्र वळविल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप करत सिडकोत जवळपास सर्वच नगरसेवकांनी सभागृहात उभे राहून संताप व्यक्त केला. पंचवटी विभागावर आरोप होत असल्याने गुरुमित बग्गा व शाहू खैरे यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी माजी महापौर रंजना भानसी यांनी केली. नाशिकरोड विभागातील नगरसेवकांनीदेखील त्यांच्या भागातील पाणीप्रश्न उपस्थित केल्याने सभागृहात प्रांतवाद पेटल्याचे दिसून आले.

टंचाईची कबुली, सिंहस्थापूर्वी कामे होणार

पाणीप्रश्नावर अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी स्पष्टीकरण दिले. विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रातून ४४१ एमएलडी पाण्याचे नियोजन होते. महासभेच्या ठरावानुसार पहिल्या टप्प्यात २०७ एमएलडी क्षमतेचे केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर २०२६ च्या लोकसंख्येचा विचार करून २०७ ऐवजी १३७ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण उभारल्याने टंचाई निर्माण झाल्याची कबुली धारणकर यांनी दिली.

Nashik Road Condition | खड्डे, पाणीप्रश्नावरुन महासभेत आक्रोश
गुणरत्न सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणावर एसटी संघटना भडकल्या ! चूल बंद होत असल्याचा केला आरोप

बडगुजरांनी मांडली वस्तुस्थिती

पाणीप्रश्नावर ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी वस्तुस्थिती मांडली. पाणीटंचाईला नगरसेवक नव्हे तर प्रशासनातील असमन्वय आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप बडगुजर यांनी केला. पंचवटीत १०० एमएलटी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू असल्याने २७ एमएलडी प्रकल्प बंद होऊन केवळ ४४ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे.

मध्य नाशिकमध्येदेखील १०४ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात असल्याने केवळ ५४ एमएमएडी पाणीपुरवठा होत आहे. दारणा धरणातील आरक्षित १ टीएमसी पाण्याचा वापर होत नसल्यामुळे नाशिकरोडमध्येही अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा बडगुजर यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news