Nashik Property Tax | मालमत्ता कराची 13 हजार देयके प्रलंबित

Nashik Property Tax | पाडलेल्या ४,८०६ मालमत्तांनाही करबिले
Property Tax
Property Tax Pudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील कारभारातील विसंगती पुन्हा एकदा समोर आली आहे. शहरातील एकूण ६ लाख ८ हजार २३० मालमत्तांपैकी तब्बल १३ हजार २२१ मालमत्तांची कर देयके अद्याप छापलेली नाहीत. दुसरीकडे, गेल्या काही वर्षांत पाडलेल्या ४,८१७ मालमत्तांपैकी ४,८०६ अस्तित्वात नसलेल्या मालमत्तांनाही कराची देयके काढल्याने विभागाच्या नोंदी आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Property Tax
Ozar Flyover Repair | "ओझरला उड्डाणपूल दुरुस्ती, सात दिवस नाशिक लेन बंद! धोकादायक भगदाडामुळे एकेरी वाहतूक व्यवस्था"

महापालिकेकडून ५ लाख ९५ हजार ९ देयके छापल्याचा दावा करण्यात आला असला, तरी त्यांचे वितरण अद्याप पूर्ण झालेले नाही. देयकांचे वाटप खासगी यंत्रणेमार्फत सुरू असून, १३ हजारांहून अधिक मालमत्तांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या महसूल वसुलीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षांत शहरातील ४,८१७ मालमत्ता पाडण्यात आल्या आहेत. मात्र, त्यापैकी ४,८०६ मालमत्तांची कर देयके तयार झाल्याचे समोर आले आहे. अस्तित्वात नसलेल्या मालमत्तांना करबिले पाठविली जात असल्याने मालमत्ता कर विभागाच्या अभिलेखांची अचूकता आणि अद्ययावतपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Property Tax
Nashik Rain Yellow Alert Update | "संततधार सुरूच; उद्या नाशिक जिल्ह्यासाठी पुन्हा 'यलो अलर्ट' जारी"

मिळकतींची आकडेवारी

शहरातील सर्वाधिक १ लाख ४९ हजार ९८७ मालमत्ता पंचवटी विभागात असून, सर्वात कमी ८० हजार ९९० मालमत्ता सातपूर विभागात आहेत. याशिवाय पूर्व विभागात ९६ हजार ३७४, सिडको विभागात १ लाख ४५ हजार २३, नाशिक रोड विभागात ८४ हजार ६२७ आणि पश्चिम विभागात ४३ हजार ९०९ मालमत्तांची नोंद आहे. यात सातपूर- ६६४, पश्चिम- ३२१, पूर्व- १७९, पंचवटी- ९०६, सिडको- ८२६ आणि नाशिक रोड- १,१११ अशा एकूण ४,८१७ पाडलेल्या मालमत्तांपैकी ४,८०६ मालमत्तांची कर देयके तयार केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news