Nashik Municipal Corporation | नाशिकमध्ये गॅस पाइपलाइनच्या खोदकामासाठी मनपाचे कडक नियम; रस्त्यांच्या सुरक्षेसाठी मोठे निर्णय!

Nashik Municipal Corporation | रस्ते पुनर्स्थापनेसह खोदकामासाठी कडक नियम
Nashik Mayor Reservation
नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal CorporationPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) सुरू असलेल्या गॅस पाइपलाइनच्या खोदकामामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन महापालिकेने एमएनजीएलच्या कामांसाठी कडक नियम निश्चित केले आहेत. गॅस पाइपलाइनचे काम थांबविण्याची भूमिका नसून, नागरिकांना कमीतकमी त्रास होईल आणि रस्त्यांची अवस्था आणखी खराब होणार नाही, याची दक्षता घेऊन कामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Nashik Mayor Reservation
CM Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस 19 ऑगस्टला नाशिक दौऱ्यावर; भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीला लावणार हजेरी!

यासंदर्भात मंगळवारी स्मार्ट सिटी कार्यालयात मनपा व एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. खोदकामानंतर रस्त्याची पुनर्स्थापना निर्धारित नियमांनुसार व दर्जादार पद्धतीने करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. कामाच्या ठिकाणी बॅरिकेडिंग, दिशादर्शक फलक आणि आवश्यक सुरक्षाव्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

रस्त्यांचे खोदकाम करताना सॉ-कटरचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे कट व्यवस्थित होऊन पुनर्स्थापनेचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच खोदकामानंतर रस्त्यावर पडणारा मलबा तातडीने हटविण्याचे एमएनजीएलने मान्य केले. मलब्यामुळे वाहतुकीला अडथळा आणि अपघाताचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

एमएनजीएलकडून शहरातील आतापर्यंत पूर्ण झालेली, सुरू असलेली आणि प्रस्तावित कामे दर्शविणारा सविस्तर जीआयएस आराखडा मनपाला देण्यात येणार आहे. यामुळे कामांचे नियोजन, पाहणी आणि दोन्ही यंत्रणांमधील समन्वय सुलभ होणार आहे.

४८ तासांत ग्राहक सेवा क्रमांक

एमएनजीएलचा ग्राहक सेवा क्रमांक ४८ तासांत कार्यरत करून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. गॅसजोडणी अथवा कामांबाबतच्या तक्रारी थेट नोंदविता येणार आहेत.

Nashik Mayor Reservation
CM Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस 19 ऑगस्टला नाशिक दौऱ्यावर; भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीला लावणार हजेरी!

निर्णयांचे ठळक मुद्दे

  • सॉ-कटरनेच रस्ते कापण्याचे निर्देश

  • खोदकामानंतर मलबा तातडीने हटविणार

  • बॅरिकेडिंग व दिशादर्शक फलक बंधनकारक

  • पूर्ण, सुरू व प्रस्तावित कामांचा जीआयएस आराखडा मनपाला

  • ४८ तासांत ग्राहक सेवा क्रमांक कार्यरत

  • घराघरांतील नोंदणीसाठी कर विभागाची मदत

  • एमएनजीएलची कामे न थांबविता समन्वयातून पूर्ण करण्याचे निर्देश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news