Nashik Hotel Notice | हॉटेल्स, खानावळी, केटरर्सना नोटिसा

Nashik NMC Notice | चेंबरमध्ये उरलेले अन्न फेकणाऱ्यांवर मनपा करणार कारवाई
Pure paneer in hotels
Pure paneer in hotels | हॉटेलमध्ये आता मिळणार शुद्ध पनीर
Published on
Updated on

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेच्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने प्रभाग १५ मध्ये स्वच्छता व ड्रेनेज व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत परिसरातील सर्व हॉटेल्स, लहान-मोठ्या खानावळी तसेच केटरर्सची पाहणी करून त्यांना कडक सूचना व नोटीस देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Pure paneer in hotels
Sindhudurg News : पावणेतीन लाखांच्या गोवा दारूसह कार जप्त

स्वयंपाकघरातील कचरा, उष्टे अन्न आणि तेलकट पाणी थेट ड्रेनेज चेंबरमध्ये गेल्याने तुंबण्याच्या समस्या निर्माण होतात. ही समस्या रोखण्यासाठी सर्व व्यावसायिक आस्थापनांनी आपल्या आऊटलेटला योग्य व भक्कम जाळी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

केवळ पाणी पास होईल आणि घनकचरा अडकून राहील, याची दक्षता घेण्याच्या तोंडी व लेखी सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत.

Pure paneer in hotels
Goa Charter Tourism Season | चार्टर पर्यटन हंगामासाठी गोवा सज्ज

ही मोहीम प्रभाग १५ मधील नाशिकरोड, सर्व्हिस रोड, पखाल रोड, काठे गल्ली आणि द्वारका यांसारख्या प्रमुख परिसरांमध्ये राबवली जात असून दोन-तीन दिवस ही कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. आवेश पलोड, विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाठ आणि स्वच्छता निरीक्षक हेमंत झुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष तपासणी व प्रबोधन मोहीम राबवण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील काळात योग्य ती प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशाराही पालिका प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news