Nashik Municipal Corporation | फायर ऑडिट नसल्यास इमारत सील करणार

Nashik Municipal Corporation | महापालिकेचा इशारा : वीज, पाणीपुरवठाही तोडणार
Nashik Mayor Reservation
नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal CorporationPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिका हद्दीतील शासकीय, निमशासकीय तसेच व्यावसायिक इमारतींना वर्षातून दोन वेळा फायर ऑडिटकरणे बंधनकारक करण्यात आले आहे. फायर ऑडिटचा अहवाल सादर न करणाऱ्या आस्थापनांच्या इमारतींचा पाणीपुरवठा व वीजपुरवठा खंडित केला जाणार असून, इमारत सील करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

Nashik Mayor Reservation
Krishi Kumbh 2026 Nashik | शेतकरी जुगाड ते तंत्रज्ञान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्य शासनाने राज्यात २००८ पासून महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व सुधारित अधिनियम २०२३ व नियम २००९ हे लागू केले आहेत. या अधिनियमातील तरतुदीनुसार विविध स्वरूपाची कार्यालये,

आस्थापना तसेच इमारतींच्या वापराच्या अनुषंगाने अग्निप्रतिबंधक उपायोजना करणे तसेच संबंधित उपाययोजना दुरुस्त व कार्यक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्थात फायर ऑडिट अहवाल वर्षातून दोन वेळा सादर करणे बंधनकारक आहे.

Nashik Mayor Reservation
Nashik Census 2026 | शिकच्या जनगणनेसाठी 5 हजार प्रगणकांची फौज! 16 मे पासून पहिल्या टप्प्यातील घरगणनेला सुरुवात

त्यानुसार महापालिकेच्या अग्निशमन प्रतिबंधक विभागाने अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची पूर्तता न करणाऱ्या आस्थापनांचा वीजपुरवठा व पाणीपुरवठा खंडित करण्याबरोबरच इमारत सील करण्याचा इशारा दिला आहे.

फायर ऑडिट केल्यानंतरही आग प्रतिबंधक उपाययोजना व संबंधित दाखला सादर न करणाऱ्या दखलपात्र व अदखलपात्र अपराध म्हणून गुन्हा नोंदविल्यास सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत सश्रम कारावास व २० ते ५० हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई होऊ शकते, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news