Nashik Municipal Corporation-'स्वीकृत'च्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा

नाशिक महानगरपालिका- प्रशासनाच्या प्रस्तावानुसारच दहा सदस्यांच्या नावांची महासभेत घोषणा
नाशिक : महापालिका स्वीकृत सदस्य नियुक्तीप्रसंगी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, स्वीकृत नगरसेवक अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, चंद्रशेखर पंचाक्षरी, रामहरी संभेराव, चंद्रकांत लवटे, बाबूराव आढाव, हेमंतकुमार गायकवाड, बाबासाहेब गायकवाड. (छायाचित्रे : हेमंत घोरपडे)
नाशिक : महापालिका स्वीकृत सदस्य नियुक्तीप्रसंगी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, स्वीकृत नगरसेवक अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, चंद्रशेखर पंचाक्षरी, रामहरी संभेराव, चंद्रकांत लवटे, बाबूराव आढाव, हेमंतकुमार गायकवाड, बाबासाहेब गायकवाड. (छायाचित्रे : हेमंत घोरपडे)
Published on: 
Updated on: 

नाशिक : महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीवरून गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर शुक्रवारी (दि. २०) पडदा पडला. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी महासभेत प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसारच दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा केली. त्यामुळे भाजपकडून उबाठाचा एक उमेदवार कमी करून सातवा स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याचे सुरू असलेले प्रयत्न अखेर फोल ठरले.

उबाठा-काँग्रेसमधील अंतर्गत वाद, काँग्रेसचे नगरसेवक सुफी जीन यांची भूमिका आणि संभाव्य न्यायालयीन पेच अशा घडामोडींमुळे स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय चांगलाच गाजला होता. अखेर प्रशासनाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्याने उबाठाच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला महापालिका निवडणुकीला नऊ महिने उलटूनही स्वीकृत नगरसेवकांची निवड रखडली होती.

याप्रकरणी उच्च न्यायालयाने सहा आठवड्यांत निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेतील पक्षीय संख्याबळ आणि विभागीय आयुक्तांकडे झालेल्या गटनोंदणीनुसार भाजपच्या वाट्याला सहा, शिवसेना (शिंदे गट) दोन, तर उबाठा-काँग्रेस आघाडीला दोन स्वीकृत सदस्यपदे मिळाली होती. मात्र, या दहा जागांवरून भाजपमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असतानाच उबाठा आणि काँग्रेसमध्येही जागावाटपावरून मतमेद निर्माण झाले होते.

काँग्रेसचे नगरसेवक सुफी जीन यांनी उबाठाकडे एका स्वीकृत सदस्यपदाची मागणी केली होती. मात्र, उबाठाने त्यास नकार दिल्याने जीन यांनी भाजपशी संधान साधत सुनील आडके यांचे नाव आयुक्तांकडे सादर केले होते. त्यामुळे उबाठा-काँग्रेसमधील वाद अधिकच चिघळला. दुसरीकडे, स्वीकृत सदस्यपदासाठी दाखल झालेल्या अर्जाची छाननी करताना आयुक्त मनीषा खत्री यांनी सुनील आडके यांचा अर्ज अधिकृत गटनेत्यामार्फत सादर झालेला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हा अर्ज ग्राह्य न थरता प्रशासनाने दहा नावांचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवला होता.

प्रशासनाच्या प्रस्तावात भाजपकडून अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, चंद्रशेखर पंचाक्षरी आणि रामहरी संमेराव, शिवसेना (शिंदे गट) कडून चंद्रकांत लवटे आणि विनायक आढाव, तर उबाठाकडून हेमंतकुमार गायकवाड आणि बाबासाहेब गायकवाड यांचा समावेश होता. मात्र, उबाठाने सुचविलेल्या दोन नावांपैकी एक नाव कमी करून भाजपचा सातवा सदस्य नियुक्त करण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू होत्या. त्यामुळे प्रशासनाचा प्रस्ताव महासभेत मंजूर होणार की त्यात बदल होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. कायदेशीर पेचामुळे भाजपची माघार सुफी जीन यांच्या अर्जाचा आधार घेत उबाठाचा एक उमेदवार बाद करून भाजपचा सातवा स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत सुरू होते. मात्र, प्रशासनाने कायदेशीर तरतुदींचा

आधार घेत प्रस्तावातील नावांमध्ये बदल करण्यास नकार दिला होता. दुसरीकडे, संभाव्य राजकीय डावपेच लक्षात घेऊन उबाठाने उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. तसेच सुनील आडके आणि सुफी जीन यांना नोटीसही बजावण्यात आली होती. त्यामुळे सातव्या स्वीकृतच्या नियुक्तीचा विषय न्यायालयीन कचाटघात अडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. हा कायदेशीर पेच लक्षात घेता भाजपच्या नेत्यांनी अखेर माघार घेत प्रशासनाच्या प्रस्तावानुसारच निवडी जाहीर करण्याची भूमिका स्वीकारली.

स्वीकृत नगरसेवकांची नावे

भाजप:

अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, चंद्रशेखर पंचाक्षरी, रामहरी संभेराव.

शिवसेना (शिंदे गट): चंद्रकांत लवटे, बाबूराव आढाव.

उद्याठा:

हेमंतकुमार गायकवाड, बाबासाहेब गायकवाड

लेनकर, लवटे, गायकवाड समर्थकांचा जल्लोष

महापौरांनी दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा केल्यानंतर महासभेत नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर महापौरांनी विकासकामांच्या विषयांना मंजुरी देत महासभेचे कामकाज आटोपते घेतले. महासभा संपताच महापालिकेबाहेर भाजपचे स्वीकृत नगरसेवक संदीप लेनकर, शिंदे गटाचे चंद्रकांत लवटे, उबाठाचे बाबासाहेब गायकवाड यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.

मनपाला पोलिस छावणीचे स्वरूप

स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने शुक्रवारी महापालिका परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. उबाठाचा एक अर्ज बाद करून भाजपचा अतिरिक्त सदस्य नियुक्त केला जाण्याची भीती उबाठाच्या नेत्यांना होती. त्यामुळे महासभेत नावांची घोषणा होणार असल्याने विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी महापालिकेत गर्दी केली होती. संभाव्य राडा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी महापालिका परिसराला छावणीचे स्वरूप दिले होते.

लेनकर, लवटे, गायकवाड समर्थकांचा जल्लोष

महापौरांनी दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा केल्यानंतर महासभेत नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर महापौरांनी विकासकामांच्या विषयांना मंजुरी देत महासभेचे कामकाज आटोपते घेतले. महासभा संपताच महापालिकेबाहेर भाजपचे स्वीकृत नगरसेवक संदीप लेनकर, शिंदे गटाचे चंद्रकांत लवटे, उबाठाचे बाबासाहेब गायकवाड यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.