

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेत बहुमताने सता स्थापन करणार असलेल्या भाजपमध्ये महागौर, उपमहापौरपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. दि. ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीसाठीच्या अजांचे बाटप सुरू असून आतापर्यंत भाजपचे गटनेते अॅड. श्याम बडोदे आणि दीपाली गिते यांनी प्रत्येकी दोन अर्ज घेतले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये या दोन्ही पदांसाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे.
महापौरपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात टाकली जाणार याकडे सबंध नाशिककरांचे लक्ष लागून आहे. दि. ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदांसाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पहिली महासभा महापौर, उपमहापौर निवडीसाठी होणार आहे. त्या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगळवारी (दि. ३) सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत महापौर पदासाठी नामनिर्देशपत्र दाखल करता येतील. या पदांची निवड झाल्यानंतर लगेचच स्थायी समितीच्या सदस्यांसाठी दसरी महासभा घेण्याचे नियोजन आहे. त्याप्रमाणे नगरसचिव विभागाने कार्यक्रम घोषित केला आहे. दरम्यान, ७२ जागांसह बहुमत प्राप्त केलेल्या भाजपचे महापौर आणि उपमहापौर बिनविरोध निवडले जाणार आहेत.
मात्र, महापौरपदाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नसल्याने या पदासाठी पक्षांतर्गत जोरदार चुरस दिसून येत आहे. महापौरपदासाठी भाजपचे गटनेते अॅड. बडोदे आणि प्रभाग १ च्या नगरसेविका दीपाली गिते यांनी प्रत्येकी २ अर्ज नेले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये महापौरपदासाठी जोरदार लाविंग सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. महापौरपदाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार? चाकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.
'स्थायी'साठीही रस्सीखेच
महापौर, उपमहापौर निवडीच्या दिवशीच स्थायी समितीच्या सदस्यांचीही नियुक्ती केली जाणार असल्याने यासाठीदेखील भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. ७२ सदस्यांसह भाजप बाहमताने सत्ता स्थापन करणार असल्याने, भाजपचाच महापौर, उपमहापौर होणार आहे. याशिवाय स्थायी समितीवर भाजपचेच वर्चस्व राहणार आहे. सदस्य संख्येनुसार स्थायी समितीच्या १६ पैकी १० सदस्य भाजपचे असणार आहेत. शिंदे सेनेचे ३, तर उम्राटाचे दोन असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा १ सदस्य असणार आहे. काँग्रेस तसेच मनसेला स्थायी समितीवर जाता येणार नाही.
भाजामध्ये अशी पद्धत नाही. ज्यांनी परस्पर महापौर व उपमहापौरसाठी उमेदवारी अर्ज नेले आहेत, ते पक्षशिस्तीला धरून नाही, भाजपमध्ये सर्वसंमतीने पण एकगताने निर्णय पेवले जातात. त्यामुळे कदाचित अतिउत्साहात हे घडले असेल, भाजपच्या सर्व नगरसेवकांना प्रशिक्षण व पक्षशिस्तीचे धडे दिले जातील, भाजप नेहमीच अनुशासन, संघटन व पक्षशिस्त याला महत्त्व देतो. राजकारण करताना उताविळपणा योग्य नाही.
सुनील केदार, शहराध्यक्ष, भाजप