Nashik MSRTC News | ‘लालपरी’त झळकणार आता अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक

वाढत्या तक्रारींवर महामंडळाने घेतला निर्णय
Maharashtra State Road Transport Corporation
MSRTC, Maharashtra State Road Transport Corporationpudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी बघता राज्य परिवहन महामंडळाने आगारप्रमुखांचे सद्यस्थितीत सुरू असलेले दूरध्वनी क्रमांक बसमध्ये दर्शनी भागात लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता प्रवासादरम्यान प्र‌वाशांना येणाऱ्या अडीअडचणींबाबत दाद मागता येणार आहे. तसेच प्राप्त तक्रारींवर तत्काळ तोडगा काढला जाणार आहे. (Due to the increasing complaints of passengers, the State Transport Corporation has decided to install the telephone numbers of Agar Pramukh)

एसटीचा प्रवास करताना अनेकदा प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. तेव्हा दाद कुठे मागायची, असा प्रश्न पडतो. अनेकदा या संदर्भात परिपत्रकीय सूचना करण्यात आलेल्या आहेत. तरीदेखील त्याचे पालन होतेच असे नाही. त्यामुळे आता प्रवाशांना येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी आणि पर्यायाने एसटीची सेवा सुधारण्यासाठी आता एसटीच्या बसमध्येच आगार व्यवस्थापक आणि स्थानक प्रमुखाचे दूरध्वनी क्रमांक एसटीच्या बसच्या प्रदर्शनीय भागात लावण्याचा निर्णय घेतला आहे.

या तक्रारींचा असतो समावेश

एसटीचा चालक अतिवेगाने बस चालवितो. चालक वाहन चालवताना मोबाइल पाहत किंवा मोबाइलवर बोलत आहे. वाहकाने सुट्टे पैसे परत केले नाहीत. वाहकाचे वर्तन असभ्य आहे. योग्य थांब्यावर बस थांबविली नाही. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला, अशा तक्रारी प्रवासी मुख्यालयाकडे करतात. आता त्यासाठी कार्यालय गाठण्याची आवश्यकता भासणार नाही. बसमध्येच चालकाच्या मागील बाजूस संबंधित आगार व्यवस्थापक आणि स्थानकप्रमुखाचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक दिलेले असतील, त्यावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवता येईल.

शनिवारपासून प्रत्येक बसमध्ये सुविधा

येत्या शनिवारपासून एसटीच्या बसेसमध्ये दूरध्वनी क्रमांक लावण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. टेलिफोन जर बंद असतील तर ते तातडीने सुरू करावेत, असेही या पत्रकात म्हटले आहे. दूरध्वनीवर आलेल्या तक्रारींचे रेकॉर्ड ठेवणे आणि त्याप्रमाणे तक्रारींचा निपटारा करण्यात यावा. या कामात कुचराई केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news