Nashik Missing Boy : दोन वर्षांचा बालक बेपत्ता; नदीपात्रात शोधमोहीम सुरु

वणी पोलीसांकडून संपर्क साधण्याचे आवाहन
वणी (नाशिक)
दोन वर्षांचा बालक घरासमोर खेळत असताना बेपत्ता झाला आहेPudhari News Network
Published on
Updated on

वणी (नाशिक) : वणी पोलिस ठाणे हद्दीत बोरीचा पाडा, कसबे वणी येथील दोन वर्षांचा बालक गणेश जितेंद्र चौधरी बेपत्ता असून रविवारी (दि.२८) दुपारी तो घरासमोर खेळत असताना नाल्यात पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत गणेशचे वडील जितेंद्र चौधरी यांनी वणी पोलिस स्टेशनला प्रत्यक्ष येऊन माहिती दिली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास गणेश घरासमोर खेळत असताना त्याचा तोल जाऊन वाहत्या नाल्यात पडला असण्याची शक्यता त्यांनी पोलिसांसमोर बोलून दाखवली. यानंतर तिळेश्वर मंदिर, कृष्णगाव, ओझरखेड धरण व परिसरात पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.

येथे संपर्क साधण्याचे आवाहन

दोन वर्षीय गणेश हा रंगाने सावळा, उंची अंदाजे २ फूट असून अंगकाठी सडपातळ आहे. त्याच्या अंगात काळ्या रंगाचा टी-शर्ट, उजव्या कानात तांब्याची बाळी असून तो कुणास आढळून आल्यास वणी पोलिस ठाणे - 02557 221033, सपोनि गायत्री जाधव - 7588516042, पोउनि गणेश कुटे - 7620648807, पोउनि हेमंत राऊत - 588474200 व जितेंद्र वसंत चौधरी (वडील) - 9011523344 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news