Nashik MIDC police station | एमआयडीसी पोलिस ठाण्यासाठी स्वतंत्र इमारतीचा प्रस्ताव

गैरसोय टळणार; सहायक पोलिस आयुक्त कार्यालयाचाही समावेश
Nashik MIDC police station
Nashik MIDC police station
Published on: 
Updated on: 

सिडको : राजेंद्र शेळके

अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून स्थापन करण्यात आलेल्या एमआयडीसी पोलिस ठाण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अंबड विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त कार्यालयाचाही समावेश करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरुटे यांनी दिली.

एमआयडीसी पोलिस ठाणे सध्या पूर्वीच्या पोलिस चौकीच्या जागेवर कार्यरत असून, चौकीचे विस्तारीकरण करून अतिरिक्त खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. या पोलिस ठाण्याचा प्रस्ताव प्रथम पोलिस आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.

त्यानंतर तो पोलिस आयुक्त कार्यालयाने शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. सध्या एमआयडीसी ठाण्यात स्वतंत्र लॉकअपची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अटक केलेल्या संशयितांना अंबड ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले जाते. तेथील लॉकअप भरल्यास शहरातील इतर उपलब्ध पोलिस ठाण्यांच्या लॉकअपचा वापर केला जातो. त्यामुळे स्वतंत्र इमारत उभारण्याची आवश्यकता आहे.

नवीन स्वतंत्र इमारतीत अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या कक्षचा ही समावेश आहे. या कार्यालयाच्या अखत्यारीत इंदिरानगर, अंबड, एमआयडीसी आणि सातपूर ही चार पोलिस ठाणी येतात. त्यामुळे येथे सहायक पोलिस आयुक्त कार्यालय उभारण्याचाही निर्णय महत्त्वाचा मानला

मंजूर मनुष्यबळही मिळण्याची गरज

एमआयडीसी ठाण्यासाठी मंजूर पदांमध्ये ४ पोलिस निरीक्षक, ६ सहायक पोलिस निरीक्षक, १५ उपनिरीक्षक, ४९ हवालदार आणि ९३ शिपाई अशी मोठी कर्मचारीसंख्या मंजूर आहे. मात्र सध्या केवळ १ पोलिस निरीक्षक, २ सहायक निरीक्षक, २ उपनिरीक्षक आणि ५१ कर्मचारी कार्यरत आहेत. या पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात अंबड औद्योगिक वसाहत, घरकुल योजना, पाथर्डी फाटा, केवल पार्क, अंबडगावचा काही भाग, बेळगाव ढगा, चुंचाळे तसेच महामार्गावरील जुना जकात नाका या परिसरांचा समावेश असल्याने मनुष्यबळ आणि स्वतंत्र इमारतीची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.

एमआयडीसी पोलिस ठाणे निर्मितीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता. या नवीन पोलिस ठाण्याला अद्ययावत इमारतीसाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री तसेच शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

- आमदार सीमा हिरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news