

नाशिक : अत्याधुनिक उपचाराबरोबरच केरळ राज्यात मिळणारे आयुर्वेदिक उपचार नाशिकमध्ये उपलब्ध करून आयुर्वेदात कॅशलेस मेडिक्लेम देणारे नाशिकचे पहिले डॉ. हासे हॉस्पिटल खऱ्या अर्थाने रुग्णांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले.
अक्षय तृतीया मुहूर्तावर डॉ. संदीप हासे आणि डॉ. प्राजक्ता हासे यांच्या डॉ. हासे हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होम याचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर, डॉ. अविनाश धर्माधिकारी, मनसेचे दिनकर पाटील, माजी खा. हेमंत गोडसे, डी. जी. सूर्यवंशी, निमा अध्यक्ष डॉ. तुषार सूर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गुरुमाऊली मोरे यांनी हॉस्पिटल लवकरच पंधरा बेडवरून पन्नास बेडपर्यंत वाढेल असा आशीर्वाद दिला. तसेच डॉ. हासे यांच्या हाडे आणि मणक्याच्या उपचारातील कौशल्याची प्रशंसा केली. प्रमुख मार्गदर्शक डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी उपचार प्रणालींच्या एकत्रित उपयोगावर भर देत एकत्रित प्रणालीमुळे क्रॉनिक आजारांवर अधिक प्रभावी उपचार होऊ शकतील, असे मत व्यक्त केले. माजी खा. गोडसे यांनी आयुर्वेद उपचार पद्धती अतिशय पुरातन असल्याचे म्हटले. याप्रसंगी माजी नगरसेवक सुवर्णा मटाले, हर्षा गायकर, भागवत आरोटे, प्रतिभा पवार, मधुकर जाधव, डॉ. वैभव महाले आदी उपस्थित होते.