

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ऑनलाइन औषध विक्री, कॉर्पोरेट स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेतर्फे बुधवारी (दि.२०) पुकारलेला देशव्यापी बंद जिल्ह्यात यशस्वी झाला. जिल्ह्यात ८ हजारांहून अधिक औषध विक्रेते व १२०० पेक्षा अधिक होलसेल औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी झाले होते. नाशिक डिस्ट्रिक्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील मेडिकल सुरू असल्याने आपत्कालीन स्थितीत रुग्णांना औषधे उपलब्ध करून देता आली. ऑनलाइन औषध विक्रीबाबत कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. केंद्राने २०१८ मध्ये आणलेल्या नोटिफिकेशनचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नाही.
दिल्ली उच्च न्यायालयाने या विक्रीला स्थगिती दिली असतानाही देशात सर्रासपणे बेकायदेशीर ऑनलाइन विक्री सुरू आहे. या विरोधात औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने सहभाग घेत बंद यशस्वी केला. बंदमुळे काही प्रमाणात रुग्णांची गैरसोय झाली. डॉक्टरांनी अत्यावश्यक रुग्णांना थेट मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
दुसरीकडे मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात औषध विक्री सुरू असल्याने, अत्यव्यस्थ रुग्णांना दिलासा मिळाला. यावेळी औषध प्रशासनाने रुग्णांसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिले होते. दरम्यान, असोसिएशनतर्फे अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना निवेदन दिले. याप्रसंगी अध्यक्ष नितीन देवरगावकर, सचिव गणेश निकम, माजी जिल्हाध्यक्ष सुदेश आहेर, संदीप शेवाळे, जगदीश भोसले, राहुल ब्राह्मणकर, अतुल नागरे उपस्थित होते.
मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात औषध विक्री सुरू असल्याने, अत्यव्यस्थ रुग्णांना दिलासा मिळाला. यावेळी औषध प्रशासनाने रुग्णांसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिले होते. दरम्यान, असोसिएशनतर्फे अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना निवेदन दिले. याप्रसंगी अध्यक्ष नितीन देवरगावकर, सचिव गणेश निकम, माजी जिल्हाध्यक्ष सुदेश आहेर, संदीप शेवाळे, जगदीश भोसले, राहुल ब्राह्मणकर, अतुल नागरे उपस्थित होते.
रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिले होते. तसेच बंदच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना आगाऊ औषधे खरेदी करून ठेवण्याबाबतचे आवाहन केले होते. त्यामुळे रुग्णांची फारशी गैरसोय झाली नाही. मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांत औषध विक्री सुरू असल्याने, तेथून रुग्णांना औषधे घेता आली. आम्ही रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर होतो.
- सुरेश देशमुख, सहायक आयुक्त, औषध प्रशासन