रशियात कार अपघातात नाशिकमधील एमबीबीएस विद्यार्थी ठार

गणशोत्सवानिमित्त गावी येऊन परत जात असताना अपघात
Nashik MBBS student accident
रशियात कार अपघातात नाशिकमधील एमबीबीएस विद्यार्थी ठार झाला
Published on
Updated on

सिडको : गणपतीसाठी नाशिकला येऊन आई-वडिलांना भेटून पुन्हा रशियात शिक्षणासाठी जात असताना कजागीस्थान येथे कार व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात नाशकातील विद्यार्थी ठार झाला आहे . अभिषेक युवराज जाधव ( वय २२ रा.  इंदिरा गांधी पुतळया जवळ जेलरोड नाशिक रोड ) असे ठार झालेल्या विद्यार्थाचे नाव आहे .

अभिषेक हा रशियामध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकता होता. गणेशोत्सवानिमित्त तो नाशिकला आई-वडिलांकडे आला होता. सोमवारी (दि.९) पहाटे तो विमानाने रशियाला गेला. अभिषेक व चार ते पाच मित्र कारने जात असताना कजागीस्थान येथे रस्त्याच्या बाजूला मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरु होते. तेथील ट्रकला काही तरी अडथळा आला वा तो ट्रक अचानक रस्त्यावर आला व यावेळी भरधाव वेगात असणारी कार त्या ट्रकवर जाऊन धडकली .अभिषेक कारमध्ये ड्राँयव्हरच्या बाजूच्या सीटवर  बसलेला होता. त्यामुळे अभिषेक जागीच ठार झाला अन्य मित्र गंभीर जखमी झाले आहेत .

अभिषेक हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याला एक लहान बहिण आहे. आभिषेकचे वडील नाशिक  महानगरपालिका सिडको विभागात कर्मचारी आहेत .अभिषेकच्या आईने मागील पंचवार्षिक महापालिका निवडणूकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढावली होती . आभिषेकचा मृतदेह गुरुवारी (दि.१२) सांयकाळपर्यत दिल्लीहून मुबंई  व नतंर नाशिकला आणण्यात येणार आहे . अभिषेकच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news