

नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीत १२२ पैकी सर्वाधिक ७२ जागांवर विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा महापालिकेची सत्ता एकहाती काबीज करण्याचा इतिहास रवणाऱ्या भाजपने मुंबई महापालिकेतील सत्तेची गणितं जुळवताना नाशिकमध्ये अखेरच्या क्षणी शिवसेनेला (शिंदे गट) सत्तेत सहभागी करून घेत राष्ट्रवादीच्या बिनासर्त पाठिंब्याच्या जोरावर निवडणूक पश्चात का होईना महायुतीचा '१०० प्लस'चा आकडा गाठलाय.
नाशिक कुंभनगरीच्या १७ व्या महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके, तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या विलास शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. केवळ नावाने नव्हे तर, कामाने नाशिककरांच्या परापरांत राम पोहोचविण्याचा संकल्प नूतन महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी केला आहे. हिमगौरी आहेर यांच्या रूपाने तब्बल २१ वर्षानंतर नाशिकचे महापौरपद मराठा समाजाला मिळाले असून, स्थायी समितीच्या पहिल्या महिला सभापती ते महापौर अशी मोठी मजल त्यांनी मारली आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिकच्या महापौर-उपमहापौरपदासाठी विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. नाशिक महापालिकेत भाजपचे स्यष्ट बहुमत असल्याने महापौर भाजपचाच होणार हे स्पष्ट होते. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी यासाठी खऱ्या अथर्थाने संकटमोचकाची भूमिका पार पाडली. महापौरपदासाती हिमगौरी आहेर आडके, तर उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप पांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील चर्चेनंतर ऐनवेळी शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याचा तसेच उपमहापौरपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता विशेष सभेला सुरुवात झालो. तत्पूर्वी भाजपचे नगरसेवक भगवे फेटे परिधान करून एकाचवेळी सभागृहात पोहोचले. तर, शिवसेनेचे नगरसेवक गटागटाने पोहोचले.
महापौर निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उबाठाचे नगरसेवक सभागृहात आले, पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस-अपक्ष, मनसे व काँग्रेसने नगरसेवक दाखल झाले. महापौर पदासाठी भाजपकडून आहेर-आडके व उबाठा कडून सीमा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननी अंती अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. या मुदतीत भाजप गटनेत्यांसह महापौरपदाच्या उमेदवार आहेर, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी बिनविरोधाची सभागृहाची परंपरा जपण्यासाठी अर्ज माघारी घेण्याची विनंती उयाठा गटनेते केशव पोरजे यांना केली. ही मागणी मान्य करत उयाठाच्या पवार यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आहेर यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकाऱ्यांनी घोषित केले. यानंतर उपमहापौरपदाच्या निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली. उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे विलास शिंदे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, राहुल दिवे तसेच भाजपचे मच्छिंद्र सानप यांनी अर्ज दाखल केले होते. दिवे यांनी माघार घेतल्यानंतर तिदमे यांनीही मापारीची विनवणी मान्य करत आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिंदे यांचीही उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. पीठासन अधिकारी आयुष प्रसाद, आयुक्त मनीषा खत्री यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
सव्वा वर्षाचा फॉर्म्युला निश्चित नाही
महापौरपदावरून नाराज झालेल्या शहराध्यक्ष सुनील केदार यांनी महापौरपदाचा कालावधी सव्वा सव्वा वर्ष ठरल्याचा दावा केला होता. परंतु, कुंभमेळामंत्री महाजन यांनी केदार यांचा दावा फेटाळून लावला आहे. महापौरांचा कालावधी किती असावा याचे आज काहीच ठरलेले नाही. पुढे काय करायचे याचाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील असे सांगत, त्यांनी केदार यांनी केलेला दावा हाणून पाडला आहे.
८८ आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे सुयोग्य नियोजन करताना नाशिकच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वपक्षीय नगरसेवकांना बरोबर घेऊन काम केले जाईल. प्रत्येक मरात केवळ नावानेच नव्हे तर कामाने राम पोहोचविला जाईल.
- हिमगौरी आहेर-आडके, नूतन महापौर, नाशिक
सिंहस्थाच्या माध्यमातून नाशिकचा लौकिक जगभर पोहोचविण्यासाठी केंद्र व राज्याच्या धर्तीवर नाशिक महापालिकेतही महायुतीची सत्ता गरजेची होती. नाशिककरांना अपेक्षित विकास घडवून दाखवू, आत्ता एकच ध्यास नाशिकचा विकास.
- विलास शिंदे, नूतन उपमहापौर, नाशिक