Nashik Ganesh Utsav | नाशिकच्या बाजारपेठेत गणेशोत्सवाचा सप्तरंगी उत्साह; सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी भक्तांची गर्दी

Nashik Ganesh Utsav | गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिल्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये गणेशमूर्तींसह सजावटीच्या विविध वस्तूंची रेलचेल पाहायला मिळत आहे.
Nashik Ganesh Utsav
Nashik Ganesh Utsav
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिल्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये गणेशमूर्तींसह सजावटीच्या विविध वस्तूंची रेलचेल पाहायला मिळत आहे. आकर्षक रंगसंगती, आधुनिक डिझाइन आणि पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेल्या सजावटीच्या वस्तूंना ग्राहकांकडून विशेष पसंती मिळत आहे.

Nashik Ganesh Utsav
Nashik SIR Voter | नाशिक जिल्ह्यातील 7 लाखांहून अधिक मतदारांना नोटीस; 'एसआयआर' पडताळणी प्रक्रियेला वेग!

गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी आकर्षक मखर, विविध प्रकारचे पडदे, फुलांच्या माळा, तोरणे, विद्युत रोषणाई, कागदी व कापडी सजावट, कृत्रिम पाने - फुले तसेच पारंपरिक सजावटीचे साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे. यंदा घरगुती गणेशोत्सवासाठी लहान आकारातील मखर आणि कमी जागेत बसणाऱ्या सजावटीच्या वस्तूंना मागणी वाढली आहे.

एलईडी दिव्यांच्या माळा, रंग बदलणारे दिवे, आकर्षक कंदील आणि विविध आकारांच्या लायटिंगच्या वस्तूंनी दुकाने सजली आहेत. त्याचबरोबर कागद, कापड, बांबू आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तूही विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पारंपरिक सजावटीबरोबर आधुनिकतेची जोड बाजारपेठेत दिसून येत आहे.

Nashik Ganesh Utsav
BH Series Vehicle Tax | बीएच सिरिज वाहनांचा टॅक्स थकवला तर दररोज ₹100 दंड! नाशिक आरटीओचा कडक इशारा

भक्तीपुढे महागाई निरर्थक

गणरायाच्या स्वागतासाठी सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य, फुले, हार, प्रसाद तसेच विविध वस्तूंच्या खरेदीला वेग आला आहे. महागाईचा चटका जाणवत असतानाही गणेशभक्तांच्या उत्साहावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी खर्चाची चिंता बाजूला ठेवून नागरिक मनसोक्त खरेदी करत आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात 'भक्तीपुढे महागाई निरर्थक' असल्याचे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.

बाजारपेठेत उत्सवाचे वातावरण

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढत असून, आगामी दिवसांमध्ये खरेदीला अधिक वेग आला असल्याचे सजावट वस्तू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सांगितले. विविध किमतीच्या वस्तू उपलब्ध असल्यामुळे सर्वसामान्यांपासून मोठ्या मंडळांपर्यंत प्रत्येकाच्या गरजेनुसार सजावटीचे साहित्य मिळत आहे. गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी बाजारपेठही रंगीबेरंगी सजली असून, उत्सवाचे वातावरण दिसून येत आहे.

"गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू या भाविकांच्या आवडीनिवडीवरून पुणे, मुंबई, गुजरात आणि आपल्या नाशिकमधून युनिक वस्तू निवडून आणल्या जातात. या साहित्यावर वर्षभर काम करून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात विक्रीला आणल्या जातात. त्यामुळे भाविकांना हाताने तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू मिळतात. या कामामध्ये काही गरजू महिलांना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य मिळवून देत असल्याचे बाप्पाची खऱ्या अर्थाने सेवा होत असल्याचे समाधान वाटते."

- चित्रा मोहोडकर, मखर आणि सजावट व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news