Nashik | ममदापूर झालंय वन्यजीव पर्यटन केंद्र

जागतिक वन्यजीव दिन : २ प्रजातींचे ७ हजार काळवीटे
ममदापूर, वन्यजीव पर्यटन केंद्र, नाशिक
ममदापूर संवर्धन राखीवPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : निल कुलकर्णी

वाढत्या शहरीकरणामुळे वन्यजीवांचा अधिवास कमी झाला आहे. त्यामुळे एकीकडे मानव-वन्यजीव संर्घष टोकदार होत असताना वन्यजीवांची जीवनशैली त्यांना मुक्तपणे बागडताना पाहणे ही वन्यजीव पर्यटनांतर्गत वाढताना दिसत आहे.

Summary

येवल्यातील ममदापूर काळवीट अभयारण्य निसर्गप्रेमींसाठी महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत असून, येथे काळवीटांच्या २ प्रजातींची पाहण्यासाठी वन्यजीवप्रेमींची पावले वळत आहेत.

ममदापूर येथे वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे म्हणून येथे वनविभागातर्फे विशेष काळजी घेतली जाते. उन्हाळ्यात पाणवठे तयार केले जातात. येथे निवासव्यवस्था आणि काळवीटांचे रमणीय दर्शन यामुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे.

गोपाळ हरगावकर, वनरक्षक ममदापूर,नाशिक.

ममदापूर, वन्यजीव पर्यटन केंद्र, नाशिक
ममदापूर काळवीट अभायरण्याची पर्यापूरक वाहनामधून पर्यटनप्रेमींना सफर घडवून आणली जात आहे. Pudhari News Network

ममदापूर काळवीट अभायरण्याची ब्रॅण्डिंग, मार्केटिंग 'एमटीडीसी'तर्फे केली जात आहे. व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार यांच्या मार्गदर्शनात आम्ही याचे फोल्डर, ब्राॅशर प्रसिद्ध करणार असून, तिथे पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी सर्वंकष आरखडा आखत आहेत.

जगदीश चव्हाण, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी, नाशिक

ममदापूर, वन्यजीव पर्यटन केंद्र, नाशिक
ममदापूर काळवीट अभयारण्य येवला तालुक्यातील नवे वन्यजीव पर्यटन केंद्र Pudhari News Network

ममदापूर काळवीट अभयारण्य येवला तालुक्यातील नवे वन्यजीव पर्यटन केंद्र म्हणून उदयास आले आहे. येथे वनविभागाने निवासव्यवस्था उपलब्ध करून दिल्यामुळे निर्सग-वन्यजीव पर्यटनाला बहार येत आहे. नाशिक आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांतून पर्यटक येथे काळवीटांचे कळप पाहण्यासाठी येत असतात. वीकएण्डला १५० ते २०० पर्यटकांची गर्दी येथे होते. अनेक शाळा आपल्या विद्यार्थ्यांच्या सहली येथे काढत असतात. काळवीटांच्या दोन प्रजाती बसक्राब्राल आणि ॲण्टीलाेगा दोन्ही प्रकारच्या प्रजाती येथे पाहायला मिळतात. जंगलात १२ लांडगे आहेत. नीलगायचे दर्शनही पर्यटकांना सुखावत आहे.

ममदापूर, वन्यजीव पर्यटन केंद्र, नाशिक
पिवळा पळस हा दुर्मीळ वृक्ष पर्यटकांवर माेहिनी घालतो. त्यामुळे काळवीटांचे रुबाबदार शिंग, त्यांचे स्प्रिंगप्रमाणे उंच उडीप्रमाणे हा सोनरी वृक्षही पर्यटकांचे आकर्षण झाले आहेPudhari News Network

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news