Nashik Malati IVF Center | 'स्त्री बीज तस्करी' प्रकरणाच्या चौकशीला वेग

Nashik Malati IVF Center | बदलापूर येथील स्त्री बीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचल्यानंतर महापालिकेने गोविंदनगर येथील 'मालती आयव्हीएफ सेंटर'ची मान्यता रद्द करून केंद्र सील केले असून, या प्रकरणाच्या चौकशीला वेग दिला आहे.
Pregnancy
PregnancyPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बदलापूर येथील स्त्री बीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचल्यानंतर महापालिकेने गोविंदनगर येथील 'मालती आयव्हीएफ सेंटर'ची मान्यता रद्द करून केंद्र सील केले असून, या प्रकरणाच्या चौकशीला वेग दिला आहे.

Pregnancy
Kidney Disease | 100 पैकी 18 लोकांना किडनी आजाराचा धोका

बदलापूर पोलिसांकडील डॉ. अमोल पाटील यांच्याशी संबंधित रेकॉर्ड महापालिकेने मागवले आहे. या प्रकरणात किती महिलांची फसवणूक झाली, आरोपीची क्रोनोलॉजी काय होती, याचा तपास आरोग्य विभागाकडून केला जात आहे.

नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने गोविंदनगर येथील मालती आयव्हीएफ सेंटरची नोंदणी केली होती. नाशिकमध्ये नोंदणी असताना या आयव्हीएफ सेंटरचा कारभार मात्र ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे सुरू होता.

स्त्री बीज तस्करी प्रकरणात या सेंटरविरोधात बदलापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाच्या सूचनेवरून महापालिका आयुक्त मनीषा खत्री व अतिरीक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने गोविंदनगर येथील बेला विस्टार इमारतीतील पाचव्या मजल्यावर स्थित मालती आयव्हीएफ सेंटरवर धाड टाकून कागदपत्रे जप्त केली होती.

यानंतर या सेंटरची मान्यता रद्द करण्यात आली होती. त्याचबरोबर शहरातील अन्य आयव्हीएफ सेंटरचीही तपासणी महापालिकेने सुरू केली आहे. या केंद्राची तपासणी सुरू असतांनाच, डॉ. अमोल पाटील प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू केला असून या घटनेसंदर्भातील सर्व कागदपत्रे बदलापूर पोलिसांकडे मागवली आहेत.

Pregnancy
Nashik News | 'गोदावरी गौरव' ने उजळला नाशिकचा सांस्कृतिक मान!

शहरातील २५ आयव्हीएफ केंद्रांची तपासणी

या प्रकरणात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नाशिक शहरातील नोंदणीकृत २५ आयव्हीएफ सेंटरची स्वतंत्रपणे तपासणीही सुरू केली आहे. त्यासाठी महापालिकेने चार स्वतंत्र पथके तयार केली असून, प्रत्येक पथकात सहा अधिकारी व कर्मचारी आहेत. या पथकांमार्फत आतापर्यंत शहरातील सात केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे.

बदलापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मालती आयव्हीएफ केंद्रांचा स्वतंत्र तपास सुरू केला आहे. बदलापूर पोलिसांकडे या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे मागितली आहेत.

- डॉ. विजय देवकर, वैद्यकीय अधीक्षक महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news