Nashik | 'मविआ'चं ठरलं मग... हेच उमेदवार असतील : खासदार संजय राऊत

अद्वय हिरे हेच 'मविआ'चे उमेदवार : खासदार संजय राऊत
डॉ. अद्वय हिरे
डॉ. अद्वय हिरेpudhari file photo
Published on
Updated on

मालेगाव : उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अनुकूल असे वातावरण असून येथून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त जागा निवडून येवू शकतात. शिवसेनेचे उपनेते डॉ. अद्वय हिरे हे देखील भविष्यात मालेगावचे महाविकास आघाडीचे आमदार म्हणून निवडून येतील, असा विश्‍वास व्यक्त करीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त करत हिरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. खासदार संजय राऊत हे मालेगाव दौर्‍यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बाजार समिती सभापती डॉ. अद्वय हिरे उपस्थित होते.

खा. राऊत म्हणाले, निवडणुकांच्या पूर्वी दंगल घडवून धार्मिक व जातीय सलोखा बिघडवण्याची काही लोकांची नीती आहे. गेल्या दहा वर्षांत विकासाचे राजकारण करण्याऐवजी भाजपने जातीपातीचे राजकारण करून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना असून शिंदे यांची सेना म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहा यांची सेना आहे, अशी टीका देखील त्यांनी केली.

डॉ. अद्वय हिरे
धुळे : पंतप्रधानावर गुन्हा दाखल करा; असे का म्हणाले खासदार संजय राऊत...

‌खा. राऊत म्हणाले, बंडूकाका बच्छाव यांना आम्ही दिल्लीत भेटण्यासाठी बोलवले नव्हते तर ते अचानक भेटीसाठी आले होते. ते सध्या नक्की कोणत्या पक्षात आहे ते मला माहिती नाही. आमच्या पक्षाचे उमेदवार दिल्लीत निश्‍चित केले जात नाही. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच आमच्या पक्षाच्या उमेदवारी संदर्भात निर्णय होतो. आरक्षणाच्या प्रश्‍नावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व समाज घटकांशी खोट बोलत आहे. आरक्षणाचा विषय मार्गी लावायचा असेल तर तामिळनाडूच्या फार्म्युल्यानुसार आरक्षणाची मर्यादा 50 टक्के पेक्षा जास्त करणे हा उपाय असू शकतो, असे देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news