

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : पंचायत समितीच्या सहा गणांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी सीमा आहिरे यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी तहसीलदार गणेश जाधव उपस्थित होते. लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार अनुसूचित जमातीकरिता पाच जागा आरक्षित आहेत. त्यापैकी तीन जागा महिलांकरिता आरक्षित करण्यासाठी विद्यार्थिनींच्या हस्ते चिठ्ठ्यांद्वारे सोडत काढण्यात आली.
गण निहाय आरक्षण
ठाणापाडा : अनुसूचित जमाती महिला, ओझरखेड : अनुसूचित जमाती, हरसूल : अनुसूचित जमाती महिला, वाघेरा : अनुसूचित जमाती, अंजनेरी : सर्वसाधारण, देवगाव : अनुसूचित जमाती महिला
गट निहाय आरक्षण
अंजनेरी : अनुसूचित जमाती, हरसूल: अनुसूचित जमाती, ठाणापाडा : अनुसूचित जमाती महिला