नाशिक : बिबट्यांनी आणला नाकात दम

सिन्नर तालुक्यातील नऊ पिंजरे 'एन्गेज्ड'; इगतपुरी तालुक्यातून मागवले दोन
बिबट्यांचा सुळसुळाट
बिबट्यांचा सुळसुळाटpudhari news network
Published on
Updated on
सिन्नर : संदीप भोर

तालुक्यात गेल्या काही वर्षांत बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, तालुक्यात ठिकठिकाणी माणसांवर तसेच पशुधनावर हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. बहुतांश भागात पिंजरे लावण्यात आले आहेत, तरीही बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी पिंजरे लावण्याची मागणी होत आहे. सिन्नर विभागातील सर्व नऊ पिंजरे 'एंगेज' आहेत. त्यामुळे बिबट्यांनी वनविभागाच्या नाकात दम आणल्याचे चित्र आहे.

बिबट्यांचे दर्शन, हल्ल्याच्या घटना थांबत नसल्यामुळे वनविभागाने थेट इगतपुरी येथून दोन पिंजरे बोलावले आहेत. तरीही पिंजरे कमी पड़त असून, मिठसांगरे येथेदेखील बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. गतवर्षी नायगाव शिवारात बिबट्यांनी कहर केला होता. जवळपास चार ते पाच बिबटे या भागात जेरबंद करण्यात आले होते. विबट्धांनी दुचाकीस्वारांना 'लक्ष्य' केले होते. यात वनविभागाची मोठी दमछाक झाली होती. गोदें शिवारात नुकतेच बिबट्याने एका मुलावर हल्ला केला. त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे वनविभागाला दक्ष रहावे लागत आहे. मागणी येताच पिंजरे लावले जातात. मात्र सध्या बंदोबस्तासाठी पिंजराच शिल्लक नसल्याने त्यांच्यासमोरही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पूर्व भागातूनही बऱ्याच गावांतून पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. मात्र पिंजरे शिल्लक नाहीत. कर्मचारी ठिकठिकाणच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

अनिल साळवे, वनपरिमंडळ अधिकारी. सिन्नर, नाशिक

या अकरा गावांत पिंजरे

सध्या कणकोरी, पांगरी, चास, कासारवाडी, दातली, खंबाळे, सायाळे, गोंदे, नायगाव, जामगाव, ब्राह्मणवाडे आदी गावांमध्ये बिबटघांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आलेले असल्याची माहिती वनविभागाने दिली. दरम्यान, या प्रत्येक गाव शिवारात दोन-दोन पिंजरे लावण्याची मागणी होत आहे. मात्र पिंजरे उपलब्ध नसल्याने वनविभागाचीही अडचण होऊन बसली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news