

देवळा : शेरी गावातील परिसरात गुरुवारी (दि. ६) सकाळी साडेसातच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या आठवड्यात खर्डे येथे गव्हाच्या शेतात शेतकर्यांना बिबट्या दिसला होता. याठिकाणी वनविभागाच्या कर्मचार्यांनी भेट देऊन पाहणी केली. खर्डेजवळील शेरी भागात बिबट्या दिसल्याने तो एकच असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. भिका पवार यांनी वनविभागाला माहिती दिली. बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेरीसह, कनकापूर, खर्डे, वार्शी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.