Nashik Leopard News | देवळा येथील गव्हाच्या शेतात बिबट्या शिरला

नागरिकांच्या गर्दीचा आवाज ऐकून बिबट्यानेच जीव वाचवण्यासाठी धूम ठोकली
देवळा (नाशिक)
नाशिक : खर्डे, ता. देवळा येथे गव्हाच्या शेतातून धूम ठोकताना बिबट्या. (छाया - सोमनाथ जगताप)
Published on
Updated on

देवळा (नाशिक) : खर्डे येथे भरदिवसा बुधवारी ( दि.26) रोजी गव्हाच्या शेतात बिबट्या शिरला. मात्र शेतालगत जमलेल्या नागरिकांच्या गर्दीचा आवाज ऐकून बिबट्याने या ठिकाणाहून धूम ठोकली. बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने याची दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

खर्डे ता. देवळा येथे कांद्या पाठोपाठ गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. त्यात बिबट्याचे वारंवार दर्शन घडत असल्याने शेतकरी रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी धजावत नाही. बुधवारी ( दि.26) रोजी याठिकाणी शेतकरी निंबा देवरे यांच्या गव्हाच्या शेतात भर दिवसा बिबट्या शिरल्याने घबराट पसरली आहे. यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी या शेताजवळ गर्दी केली. काही जण बिबट्याला घाबरून बांधावरील झाडांवर चढले. जमलेल्या लोकांच्या गर्दीच्या आवाजामुळे गव्हाच्या शेतातून बिबट्याने येथून धूम ठोकली तर बिबट्याला बघून ग्रामस्थांचा धरकाप उडाला आहे. या परिसरात वारंवार बिबट्याची दहशत पसरल्याने पशुपालक तसेच शेतात वास्तव्यास असलेल्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने याची दखल घेऊन त्वरीत बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news