चिमणी संवर्धनात राज्यात नाशिक अग्रभागी

World Sparrow Day | मोफत घरटी वाटप, कृत्रिम घरटी निर्मितीतही पूढे
World Sparrow Day
World Sparrow Day | चिमणी संवर्धनात राज्यात नाशिक अग्रभागी File photo
Published on
Updated on

नाशिक : निल कुलकर्णी

World Sparrow Day | चिमण्याची कृत्रिम घरटी तयार करुन तिचे माेफत वाटप, घरट्यांची सर्वाधिक निर्मिती आणि त्यासाठी पर्यावरणप्रेमींनी उभारलेली चळवळ, उपक्रम आदी सर्वंकष कार्यामुळे नाशिक चिमणी संवर्धनात राज्यात सर्वात अग्रभागी ठरले आहे.

Summary
  • वचळणीच्या जागा कमी, पॅकबंद धान्य, वृक्षतोड, मोबाईल टॉवर रेडीएशन मुळे घट.

  • मोहम्मद दिलावर यांनी उभारली चिमणी संवंर्धन चळवळ.

  • प्रा. डॉ. जावळे यांनी संशोधनातून तयार केली शास्त्रशुद्ध कृत्रिम घरटी.

  • जीवदया फाउंडेशनचे हरेश शाह यांचे पक्षीसंवर्धनात विक्रमी कार्य.

पक्षी पर्यावरणाची बाराखडी चिमण्यांपासून सुुरु होते. आपल्या चिवचिवटांनी परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या या चिमण्यांची संख्या एकाएकी झपाट्याने कमी झाली. अनेक पक्षीप्रेमी, संस्था चिमणी संवर्धनासाठी सरसावल्या. कमी झालेली झाडे, कॉंक्रटीकरण, मॉलमधील पॅकबंद धान्य खरेदी पद्धत आणि चिमणीला घरट्यासाठी वळचणीच्या जागाच नष्ट झाल्याने चिमण्यांची संख्या ‌झपाट्याने घटली. त्यानंतर चिमणी वाचवण्याची व्यापक चळवळ उभी राहिली.

कृत्रिम लाकडी घरटे
कृत्रिम लाकडी घरटे

चिमण्या वाचवण्याची मोठी चळवळ मोहम्मद दिलावर यांनी नाशिकसह राज्यभर आणि जागतिक पातळीवर उभी केली. हिरवळ फाउंडेशनचे प्रा. डॉ. चेतन जावळे यांनी चिमऱ्यांचा ऱ्हास आणि त्यांच्या घरट्यावर शास्त्रशुद्ध संशोधन करुन घरटी तयार करुन मोफत वाटली. 'आपले पर्यावरण'चे शेखर गायकवाड यांनी हजारो घरटी निर्माण करुन त्यांचे मोफत वितरण केले. हरेश शाह यांंचा कृत्रिम घरटी तयार करण्याचा मोठा प्रकल्प असून त्यांनी बर्ड फिडर, वॉटर फिडर विविध आकारातील लाकडी घरटी माेफत लावली आहे. पिंपळगाव बसवंत येथे पक्षांसाठी गिजीन बुक मध्ये नाेंद झालेले आणि नाशिकमध्ये पहिले पक्षी ‘परमा कल्चर’ उभारणारे ते एकमेव पक्षी मित्र ठरले आहे. आज नाशिकमध्ये अनेक नागरिकांच्या घरावर कृत्रिम घरटी, फिडर लावलेले दिसतात. यासह चिमणी सवंर्धनाची मोठी चळवळ नागरिकांमध्ये रुजल्यामुळे यामुळे चिमण्याची संख्या स्थिर आहे. या आणि एकूणच कार्यामुळे नाशिक चिमणी संवर्धनात राज्यात अग्रेसर ठरले आहे.

गिनीज बुक मधे नोंद झालेले पिंपळगाव बसवंत येथील पक्षितीर्थ येथे उभारण्यात आलेले अजस्त्र बर्ड फिडर
गिनीज बुक मधे नोंद झालेले पिंपळगाव बसवंत येथील पक्षितीर्थ येथे उभारण्यात आलेले अजस्त्र बर्ड फिडर

चिमण्या वचळचणीच्या जागी घरटे करतात. अशा जागा सिमेंट जंगलांनी कमी झाल्या. शुज बॉक्स, प्लास्टीकमध्ये चिमणीचे अंडी सुरक्षित राहत नाहीत. चिमणी घरट्यांचा अभ्यास करुन शास्त्रशुद्ध आकाराची घरटी निर्माण केली. त्यात चिमण्यांनी पिल्ले दिली. घरट्यातून आलेली रक्कम अधिक घरटी तयार करण्यासाठी लावली. हजारो शास्त्रशुद्ध घरटी तयार केली. आज नाशिकमध्ये चिमणी संख्या स्थिर असून आता कृत्रिम घरट्यांचे प्रयोग दिल्ली, काश्मीर त्रिपूरा, राजस्थान येथे करत आहोत.

प्रा. डॉ. चेतन जावळे, चिमणी घरटी संशोधक, नाशिक

१६ वर्षांपूर्वी चिमणी पक्षाला संवर्धन गरजच नाही, असे मानले जात असे. युरोप, युके, आखाती देशांमधील संस्था, विविध देशातील सरकार यांना घेऊन आम्ही इकोसिस अॅक्शस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पेलाड यांच्या सहयोगाने आम्ही चिमण्याचे संवर्धन चळवळ जगभरात राबवली. देश विदेशात लाखो घरटी मोफत वाटली. आज चिमणी संवर्धनाची मोठी चळवळ उभी राहताना पाहतो तेव्हा समाधान वाटते.

मोहम्मद दिलावर, चिमणी चळवळीचे जनक, संस्थापक, अध्यक्ष, नेचर फॉरएव्हर सोसायटी

पिपंळगाव बसवंत येथे कृत्रिम घरटी,फिडर करुन हजारो फिडर मोफत वाटले. विक्रमी भव्य फिडर लावून पक्षीतीर्थ विकसित केले. येथे लावलेल्या शेकडो घरट्यात आज पिल्ले आहेत. त्यातून पक्षांचे परमा कल्चर निर्माण केले. आज दुबई, अमेरिका, दक्षिण अफ्रिका, केनिया या देशातून आमच्या घरटी, फिडरला मागणी येत आहे. पक्षी वाचवण्याची व्यापक जनचळवळ उभी राहील्याचे समाधान आहे.

हरेश शाह, पक्षीमित्र, पिंपळगाव बसवंत

शाह यांचे पिंपळगाव बसवंत येथील पक्षी तीर्थ अन् परमा कल्चर
शाह यांचे पिंपळगाव बसवंत येथील पक्षी तीर्थ अन् परमा कल्चर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news