Nashik Lasalgaon News | दामदुप्पट योजनेचे दप्तर पोलिसांच्या ताब्यात

पोलिस उपअधीक्षक नीलेश पालवे यांच्याकडून कारवाई
Nashik Lasalgaon damduppat scheme News
दामदुप्पट योजनेचे दप्तर पोलिसांच्या ताब्यातPudhari Photo
Published on
Updated on

लासलगाव : दामदुप्पट योजनेच्या नावाखाली राज्यभरासह परराज्यातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची घटना रविवारी (दि.6) उघडकीस आल्यानंतर सोमवारी पोलिस उपअधीक्षक नीलेश पालवे यांच्या पथकाने लासलगाव येथे धाव घेत स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रा. लि कंपनीच्या कार्यालयातील दप्तर ताब्यात घेतले आहे.

येथील रेल्वेस्टेशन रोडवर असलेल्या स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रा. लि. (लॅन्ड, प्लॉट, कन्स्ट्रक्शन, शेअर ट्रेडिंग ॲण्ड गोल्ड इन्व्हेस्टमेंट) या कंपनीच्या माध्यमातून 40 दिवसांत दामदुप्पट करून देण्याचे अामिष दाखवत संस्थाचालक संशयित योगेश काळे व फर्मचा मुख्य सूत्रधार सतीश काळे यांनी लासलगावसह राज्यातील विविध भागांतील तसेच परराज्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत दाखल पहिले फिर्यादी सोमनाथ गांगुर्डे यांची 50 लाख 86 हजार रुपयांची फसवणूक झाल्याने त्यांच्या फिर्यादीवरून लासलगाव ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस यंत्रणेकडून गंभीर दखल घेत पोलिस उपअधीक्षक पालवे यांनी कंपनीचे दप्तर ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

गुंतवणूक केलेल्या रकमेचा तपशील तर द्यावा लागणार नाही ना आणि दामदुप्पटमध्ये आलेली रक्कम परत द्यावी लागेल काय या भीतीपोटी गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली घाम फुटल्याची चर्चा लासलगाव सह परिसरामध्ये दबक्या आवाजात रंगल्याची पाहायला मिळाली

संशयित सतीश काळे याने यापूर्वी श्री ढोकेश्वर मल्टिस्टेट अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी व गौरीशंकर या नावाने संस्था स्थापन करून नऊ- दहा वर्षांत गुंतवणूकदारांना सुमारे 28 कोटींना गंडा घातल्याने त्याला साडेसहा वर्षे जेलमध्ये जावे लागले होते. त्यानंतर पुन्हा अशाच अमिषाने गंडा घातला आहे. मात्र, याबाबत एका नागरिकाने गुंतवणूकदारांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे गुंतवणूक केलेल्या पैशांची माहिती द्यावी लागणार असल्याच्या धास्तीने गुंतवणूकदार अधिकच धास्तावले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news