Traffic Control Plan | "वाहतूक नियंत्रणासाठी कुंभमेळा प्राधिकरण शेजारील जिल्ह्यांशी साधणार संवाद! नाशिकमध्ये विशेष वाहन थांब्यांचे नियोजन"

Traffic Control Plan | वाहतूक नियंत्रणासाठी कुंभमेळा प्राधिकरण शेजारील जिल्ह्यांशी साधणार संवाद
Pune
Pune ParkingFile Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी नियोजित वाहनतळांसोबतच वेगवेगळ्या भागात विशेष वाहन थांबेही उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी भाविकांना जेवण, पाणी यासह स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करू दिल्या जाणार आहेत.

Pune
Nashik Rain Yellow Alert Update | "संततधार सुरूच; उद्या नाशिक जिल्ह्यासाठी पुन्हा 'यलो अलर्ट' जारी"

असे विशेष वाहन थांबे उभारण्यासाठी शेजारील जिल्ह्यांसह गुजरात मधील काही जिल्ह्यांसोबतही कुंभमेळा प्राधिकरण संवाद साधणार असल्याची माहिती कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा वाहतूक नियंत्रण व गर्दी व्यवस्थापनासाठी शेजारील जिल्ह्यांशी समन्वय साधला जाणार असून, यासंदर्भात लवकरच महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात विविध विकासकामे हाती घेण्यात आलेली आहेत. परंतु यासोबतच गर्दीचे व्यवस्थापन करण्यावरही जिल्हा प्रशासन व कुंभमेळा प्राधिकरणाने विशेष नियोजन सुरू केले आहे.

देशभरातून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. त्यांची गर्दी व वाहनांची संख्या लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीमध्ये भाविकांना आहे, तिथेच थांबवता येऊ शकते का, आणि शहरातील गर्दी कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांना शहरात कसे आणता येईल, या दृष्टीने कुंभमेळा प्राधिकरण चाचपणी करीत आहे.

यासंदर्भात लवकरच शेजारील नऊ ते दहा जिल्ह्यांसह गुजरात मधील नाशिकलगतच्या जिल्हा प्रशासनासोबत आपत्ती विभाग अधिकारी आणि कुंभमेळा प्राधिकरण चर्चा करणार असल्याचे नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले.

Pune
Nashik Rain Yellow Alert Update | "संततधार सुरूच; उद्या नाशिक जिल्ह्यासाठी पुन्हा 'यलो अलर्ट' जारी"

नोव्हेंबरपासून साधुग्राम, टेंट सिटीचे काम

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे १० लाखांहून अधिक साधू-महंत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या सुविधेसाठी जागा अधिग्रहण करून नोव्हेंबरपर्यंत साधुग्राम आणि टेंट सिटीच्या उभारणीस सुरुवात करण्यात येणार आहे,

त्याचप्रमाणे खासगी जागामालकांनाही टेंट उभारण्याची परवानगी दिली जाणार आहे. मात्र अशा टेंट्ससाठी आवश्यक सुविधा त्यांना स्वतःच उपलब्ध करून द्याव्या लागतील, असेही कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news