Nashik Kumbh Mela 2027 |घोषणा झाली पण आराखडा गायब! नाशिक कुंभमेळ्यातील 'टेंट सिटी' प्रकल्प वर्षानंतरही कागदावरच

Nashik Kumbh Mela 2027 | घोषणेचा विसर : जागा, आराखडा, निधीची तरतूद गुलदस्त्यात
Nashik Kumbh Mela 2027
Nashik Kumbh Mela 2027 Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे

२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटक, गुंतवणूकदार, उद्योग प्रतिनिधी, उच्चभ्रू भाविक यांना नाशिकसह महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याच्या हेतूने राज्याच्या उद्योग विभागाकडून आधुनिक सुविधा असलेली 'टेंट सिटी' उभारण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. या घोषणेला वर्ष उलटले. मात्र, या 'टेंट सिटी'चा ठावठिकाणा, आराखडा निश्चित नसून, एमआयडीसीचे अधिकारीदेखील याबाबत अनभिज्ञ आहेत.

Nashik Kumbh Mela 2027
Death Registration Data | गरज आमूलाग्र सुधारणांची समाजभान

पुढारी विशेष कुंभमेळ्याचे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण केले जाणार आहे. सिंहस्थासाठी सध्या हजारो कोटी रुपयांचे रस्ते, वीज, पाणी, घाट, पार्किंग वाहतूक व्यवस्था तसेच अन्य पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. या कामांची गती पाहता, सिंहस्थापर्यंत ही कामे मार्गी लागतील काय, हा प्रश्न आहे. तर अत्याधुनिक सुविधा असलेली टेंट सिटीच्या घोषणेनंतर फारशा हालचाली न झाल्याने सांशकता आहे.

टेंट सिटी ही केवळ मुक्कामाची व्यवस्था नसून, त्यामध्ये प्रीमियम निवास, परिषद सुविधा, स्थानिक उत्पादने व एमएसएमई प्रदर्शन, खाद्यसंस्कृती आणि पर्यटन माहिती केंद्र यांचा समावेश असेल, असे स्पष्ट केले होते. मात्र, अधिकृत आराखडा जाहीर केला नसल्याने, टेंट सिटी नेमकी कुठे उभारणार, किती एकर क्षेत्रावर आणि किती क्षमतेची टेंट सिटी असेल, प्रकल्पाची अंदाजित किंमत किती असेल, याबाबतचा कुठलाही तपशील एमआयडीसी प्रशासनाकडे नसल्याची माहिती समोर येत आहे.

'टेंट सिटी' उभारण्यावर याठिकाणी चर्चा

एमआयडीसीकडून त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील खादी ग्रामोद्योग व दिंडोरी रोडवरील जलसंपदा (मेरी) विभागाच्या जागेवर 'टेंट सिटी' उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

परंतु, पुढील प्रक्रियेबाबत कोणत्याच हालचाली नसल्याने, अधिकारीदेखील अनुत्तरित आहेत. दुसरीकडे पर्यटन विभागाच्या आराखड्यानुसार गुजरातमधील सापुतारा, पालघर जिल्ह्यातील जव्हार - मोखाडा, समृद्धी महामार्गालगत टेंट सिटी उभारण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. परंतु जागेबाबतची निश्चितता, निधीची मंजुरी, कामाची निविदा ही प्रक्रिया अद्याप बाकी आहे.

Nashik Kumbh Mela 2027
Death Registration Data | गरज आमूलाग्र सुधारणांची समाजभान

अधिकारी निवृत्त, नूतन अधिकारी अनभिज्ञ

एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जयवंत पवार गेल्या ३१ मे रोजी निवृत्त झाले असून, त्यांच्या जागी कार्यकारी अभियंता म्हणून कल्पेश लहिवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना याविषयी विचारले असता, याबाबतचा प्रस्ताव मुख्यालयाला पाठविण्यात आला असल्याचे ऐकिवात असल्याचे ते म्हणाले. मात्र, जागेबाबत तसेच पुढील प्रक्रियेबाबतची माहिती घेऊन कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अधिकारी निवृत्त झाल्याने, नूतन अधिकाऱ्यास नव्याने याबाबतची प्रक्रिया करावी लागण्याचीही शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news