Nashik Krishithon | नाशिकमध्ये २१ नोव्हेंबरपासून 'कृषीथॉन'

शेतकऱ्यांसाठी ठरणार अभिनव व्यासपीठ
Nashik Krishithon |
नाशिकमध्ये २१ नोव्हेंबरपासून 'कृषीथॉन'
Published on
Updated on

नाशिक : कृषीमालाची गुणवत्ता आणि शेतकरी वर्गाला अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी १९९८ मध्ये सुरू झालेल्या कृषीथॉन प्रदर्शनाची 17 वी आवृत्ती यंदा दि. २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान ठक्कर डोम, एबीबी सर्कलजवळ, नाशिक येथे आयोजित करण्यात येत आहे. कृषीथॉन शेतकरी, कृषी उद्योजक, शास्त्रज्ञ आणि जाणकारांच्या विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठीचे अभिनव व्यासपीठ ठरले आहे अशी माहिती संजय न्याहारकर यांनी दिली

प्रदर्शनात शेतीची यंत्रे आणि उपकरणे, पीक संरक्षण आणि पोषण, अचूक कृषी तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती, कृषी रसायने आणि खते, बियाणांच्या जाती आणि आनुवंशिकी, सिंचन आणि जल व्यवस्थापन प्रणाली, कृषी व्यवसाय आणि वित्त, व्हर्टिकल शेतीचे तंत्र, कृषी क्षेत्रातील ड्रोन ॲप्लिकेशन्स, मातीचे आरोग्य आणि संवर्धन, स्मार्ट सिंचन उपाय असे विविध स्टॉल असणार आहेत. त्याबरोबरच जनजागृतीसाठी शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचाही यात समावेश असणार आहे.

या पाच दिवसीय कृषीथॉन प्रदर्शनामध्ये ३०० हून अधिक कृषीपूरक संस्थांचा समावेश असणार आहे. तसेच पीकविषयक चर्चासत्रामध्ये नामांकित शास्त्रज्ञ मार्गदर्शन करतील. कृषीथॉन युवा सन्मानच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांचा सन्मान होणार आहे. कृषी रोजगार मेळावा माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. यंदा भारत सरकारच्या लघु व सूक्ष्म मंत्रालयाद्वारे कृषीथॉनमध्ये सहभागी लघु उद्योजकांना स्टॉल भाड्यावर सबसिडी मिळणार आहे. लघुउद्योजकांना आपले उत्पादन प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे.

कृषीथॉन प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी www.krishithon.com या संकेतस्थळावर किंवा ९८२२८४२२६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन साहिल न्याहारकर ह्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news